AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | शिरूरमध्ये आजी आजारी असल्याचे सांगत केले डॉक्टरचे अपहरण अन … वाचा संपूर्ण घटना

डॉक्टर दुचाकीवरून जात असताना आरोपी कारमधून येत होते. काहीअंतर गेल्यानंतर आरोपींनी कार डॉक्टरांच्या दुचाकीला आडवी लावली.त्यानंतर त्यानां जबरदस्तीने कारमध्ये बसवले त्यानंतर त्यांच्या गळ्याला धारदार कोयता लावत जीव मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली.

Pune crime | शिरूरमध्ये आजी आजारी असल्याचे सांगत केले डॉक्टरचे अपहरण अन ... वाचा संपूर्ण घटना
प्रातिनिधीक फोटो
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 07, 2022 | 12:07 PM
Share

पुणे – जिल्ह्यात गुन्हेगारीच्या(crime) घटना वाढत असताना गुन्हे करण्यासाठी नवनवीन प्रकार वापरले जातात. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे अशीच घटना घडती आहे. शिरूर येथे एका नामांकित डॉक्टरचे पेशंट तपासण्याच्या बहाण्याने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकच नव्हे तर अपहरण केलेल्या डॉक्टरला (doctor) सोडण्यासाठी सुमारे तीन लाखाची खंडणी घेतल्याच्या माहिती समोर आली आहे. त्या प्रकरणी शिरणार पोलिसांनी तब्बल आठ जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. डॉ.संदीप तुळशीराम परदेशी (वय 59 वर्ष, व्यवसाय, वैदयकीय व्यवसायिक, रा. यशोदीप मारुती आळी शिरूर) यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. तक्रारीची तातडीने दाखल घेत शिरूर पोलिसांनी(Shirur police) तातडीने तपास चक्रे फिरवत यातील पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेशन पोलिस पथकाच्या मदतीने आरोपी कुणाल सुभाषसिंग परदेशी रा . शिरूर यास अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली. त्याबरोबरच आठ जणांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.

तर झालं असं कि आरोपीनी डॉक्टरला आजीला बरे नाही वाटतं नाही तुम्ही तातडीनं चला असे सांगितले त्यानंतर पेशंटला बघण्यासाठी म्हणून डॉक्टर तातडीने निघाले. डॉक्टर दुचाकीवरून जात असताना आरोपी कारमधून येत होते. काहीअंतर गेल्यानंतर आरोपींनी कार डॉक्टरांच्या दुचाकीला आडवी लावली.त्यानंतर त्यानां जबरदस्तीने कारमध्ये बसवले त्यानंतर त्यांच्या गळ्याला धारदार कोयता लावत जीव मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील रोख पंधरा हजार रुपये काढून घेतले. पुन्हा मारहाण करत कापडाने त्यांच्या गळा आवळला व त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची खंडणी उकळली. या सगळ्यानंतर शिरूर बाह्यमार्गावर नगर पुणे रोडवर सोडुन दिले. य प्रकरणी शिरूर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण उंदरे करीत आहेत .

LIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार

बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी एकाला अटक, विद्युत प्रवाह सोडल्यामुळे झाला मृत्यू; वनविभागाकडून चौकशी

Sudhir Kalingan: कोकणचो दशावतारी हरवलो; ‘लोकराजा’, ‘नटसम्राट’ सुधीर कलिंगण यांचं निधन

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली