AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार

एलआयसीची (LIC) जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. देशांतर्गत बाजारातील सर्वात मोठी हिस्सेदार आणि परताव्यातही जागतिक पातळीवर कंपनी आघाडीवर असल्याचा दावा करण्यात येत आहे. क्रिसिल अहवालानुसार 2000 पूर्वीच्या काळात एलआयसीचा बाजारातील हिस्सा 100 टक्के होता, जो हळूहळू कमी झाला.  2016 मध्ये 71.8  टक्क्यांपर्यंत खाली आला. 2020 मध्ये एलआयसीचा बाजारातील हिस्सा आणखी कमी होऊन 64.1 टक्क्यांवर आला. 

LIC चा जगभरात डंका, परताव्याच्या बाबतीत आघाडीवर, देशातंर्गत बाजारातील मोठी हिस्सेदार
LIC (प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 07, 2022 | 11:44 AM
Share

मुंबई : विमा क्षेत्रातील दादा कंपनी आणि देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेली आयुर्विमा महामंडळ (Life insurance corporation) ही देशांतर्गत बाजारात सर्वाधिक 64.1 टक्के हिस्सेदारी असणारी तसेच इक्विटीवर (Equity) सर्वाधिक 82 टक्के परतावा देणारी जगातील आघाडीची कंपनी ठरली आहे. 2020 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत एलआयसीचा वाटा 64.1  टक्क्यांहून अधिक होता. क्रिसिलच्या (crisil) अहवालानुसार, एलआयसी (LIC) ही आयुर्विमा प्रीमियमच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. क्रिसिलने नोव्हेंबर 2021 मध्ये तयार केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. आता हा अहवाल प्राप्त झाला आहे. सकल लिखीत हप्त्यांचा  (GWP) विचार करता हा देशातंर्गत बाजारपेठेत 64.1 टक्के आहे तो बाजार मुल्यांनुसार 56.045 अब्ज डॉलर इतका आहे. बाजारात इतकी रक्कम असलेल्या जगातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा बाजारातील एलआयसीची हिस्सेदारी अधिक आहे. मार्च 2021 पर्यंत 13.5 लाख एजंट एलआयसीशी जोडले गेले होते, जे देशातील एकूण एजंट नेटवर्कच्या 55 टक्के आहे. IPO आणण्याच्या तयारीत असलेल्या आयुर्विमा महामंडळाच्या संचालक मंडळात सहा स्वतंत्र संचालकांचा समावेश करण्यात आला आहे.

एसबीआयचा हिस्सा जास्त

2000 पूर्वीच्या काळात एलआयसीचा बाजारातील हिस्सा 100 टक्के होता, जो हळूहळू कमी झाला.  2016 मध्ये 71.8  टक्क्यांपर्यंत खाली आला. 2020 मध्ये एलआयसीचा बाजारातील हिस्सा आणखी कमी होऊन 64.1 टक्क्यांवर आला.देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या एसबीआय लाइफचा 2016 मध्ये केवळ पाच टक्के आणि 2020 मध्ये आठ टक्के बाजार हिस्सा आहे. तर  सकल लिखीत हप्त्यांचा (GWP) विचार करता हा  देशातंर्गत बाजारपेठेत 64.1 टक्के आहे तो बाजार मुल्यांनुसार 56.045 अब्ज डॉलर इतका आहे. बाजारात इतकी रक्कम असलेल्या जगातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा हा बाजारातील एलआयसीची हिस्सेदारी अधिक आहे.मार्च 2021 पर्यंत, 13.5 लाख एजंट एलआयसीशी जोडले गेले होते, जे देशातील एकूण एजंट नेटवर्कच्या 55 टक्के आहे. ही  आकडेवारी  एसबीआय लाइफपेक्षा 7.2 पट जास्त आहे.

मार्केट शेअर

बाजारातील हिस्सेदारीत दुसऱ्या कंपनीपेक्षा इतक्या मोठ्या फरकाने अग्रेसर असणारी एलआयसी ही जगातील एकमेव कंपनी आहे. अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एसबीआय लाईफचा बाजारातील हिस्सा केवळ 8 टक्के होता तर एलआयसीचा 64.1 टक्के होता. मात्र नफ्याबाबत बोलायचे झाल्यास एलआयसीचा नफेवारीतील क्रमांक हवा तसा पुढे नाही. तरीही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एलआयसीचे केवळ 40.6 कोटी रुपयांच्या निव्वळ उत्पन्न आहे. जे सरासरीपेक्षा कमी आहे.

पॉलिसी विकण्यासाठी उचललेले पाऊल

एलआयसी आणि पॉलिसीबाजार (Policybazaar) यांनी करार केला आहे. याअंतर्गत दोन्हींचे ग्राहक मुदत विमा (Term Insurance) आणि इतर उत्पादनात गुंतवणूक करु शकतात. या मोठ्या कराराचा उद्देश देशभरातील जीवन विमा उत्पादनांचे डिजिटल वितरण सुलभ करणे हा आहे, अर्थात यामुळे ग्राहकांना मोबाईलवरुनही सहज विमा खरेदी करता येईल.

IPO आणण्यापूर्वी एलआयसीच्या बोर्डात 6 स्वतंत्र संचालकांची नियुक्ती

IPO आणण्याच्या तयारीत असलेल्या आयुर्विमा महामंडळाच्या संचालक मंडळात सहा स्वतंत्र संचालकांचा समावेश करण्यात आला आहे. या नियुक्त्यांमुळे एलआयसीच्या मंडळावरील स्वतंत्र संचालकांची संख्या नऊ झाली असून, सर्व रिक्त जागा भरण्यात आल्या आहेत. कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित नियामक नियमांची पूर्तता करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

इतर बातम्या

PVC Aadhaar Card: संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड, एका मोबाईल क्रमांकावर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड

अर्थसंकल्पानंतर रिझर्व्ह बँकेकडे नजरा, रिव्हर्स रेपोत रेटमध्ये बदलाचा तज्ज्ञांचा अंदाज

‘या’ कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा