‘या’ कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार

पगार ( Salary) हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो मग ती कंपनी कोणतीही असो, भारतासह जगभरात दर महिन्याला कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचा पगार किंवा मोबदला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे दर महिन्याच्या शेवटी कर्मचारी हा आपल्या पगाराची अतुरतेने वाट पहात असतो.

'या' कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 5:30 PM

पगार ( Salary) हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो मग ती कंपनी कोणतीही असो, भारतासह जगभरात दर महिन्याला कर्मचाऱ्याला त्याच्या कामाचा पगार किंवा मोबदला देण्याची प्रथा आहे. त्यामुळे दर महिन्याच्या शेवटी कर्मचारी हा आपल्या पगाराची अतुरतेने वाट पहात असतो. मात्र तुम्हाला जर महिन्याऐवजी दर आठवड्याला पगार मिळाला तर थोडे विचित्र वाटत आहेना?, पण हे खरं आहे. इंडियामार्ट (Indiamart) या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या पद्धतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या निर्णनयानुसार या कर्मचाऱ्यांना आता आपल्या पगारासाठी महिन्याच्या पहिल्या तारखीची वाट पहावी लागणार नाहीये. तर या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार (Weekly Salary Pay Policy) मिळणार आहे. कंपनीकडून त्यांच्या अधिकृत फेसबूक पेजवर याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना महिन्याऐवजी जर दर आठवड्याला पगार दिल्यास त्यांच्या आर्थिक समस्या काही प्रमाणात कमी होतील असे या कंपनीने म्हटले आहे.

‘या’ देशातील कंपन्याही देतात दर आठवड्याला पगार

कंपनीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, कामाच्या स्वरूपात लवचिकता येण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी कंपनीने आता कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याला करण्याऐवजी दर आठवड्याला करण्याचा निर्णय घेतला आहे. इथून पुढे कर्मचाऱ्यांचा पगार हा दर आठवड्याला करण्यात येईल. कंपनीचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी चांगला असल्याचे बोलले जात आहे. भारतासह जगात जवळपास सर्वच कंपन्यांची सॅलरी पॉलिसी ही सारखीच आहे. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या शेवटी किंवा एक तारखेला पेमेंट देतात. मात्र न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हॉगंकॉंग आणि यूएसमध्ये अशा देखील काही कंपन्या आहेत, त्यांनी यापूर्वीच आपल्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

14.3 कोटी ग्राहक

इंडियामार्ट ही मार्केटिंग क्षेत्रातील एक आग्रण्य कंपनी आहे. ही कंपनी बायर्स आणि सेलर्समधील दुवा म्हणून काम करते. या कंपनीची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली होती. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यामधील एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करण्याच्या उद्देशाने या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. उपलब्ध असेलेल्या डेटानुसार या कंपनीसोबत 14.3 कोटी खरेदीदार तर 70 लाख विक्रेते जोडले गेलेले आहेत.

संबंधित बातम्या

ओवरड्रॉफ्ट सुविधेद्वारे होम लोनचे ओझे कमी करा, जाणून घ्या फायदे

‘या’ चार बँकांनी केलेत त्यांच्या नियमावलीत बदल, खातेधारकांनी जाणून घेणे महत्त्वाचे…

तेलाचे दर घसरले, अंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद असल्याचा परिणाम, ग्राहकांना दिलासा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.