AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओवरड्रॉफ्ट सुविधेद्वारे होम लोनचे ओझे कमी करा, जाणून घ्या फायदे

होम लोनवर ओवरड्रॉफ्ट सुविधेसोबतच ग्राहक छोटी छोटी अतिरिक्त रकम जमा करून आपल्या होम लोन वरील किंमत कमी करू शकतात आणि कालावधी पूर्वी देखील आपले होम लोन बंद करू शकतात.

ओवरड्रॉफ्ट सुविधेद्वारे होम लोनचे ओझे कमी करा, जाणून घ्या फायदे
गृह कर्ज घेताना तुम्हाला ‘या’ शुल्काबाबत माहिती हवीच
| Updated on: Feb 06, 2022 | 3:45 PM
Share

मुंबई : घरासाठी कर्ज (Home Loan) घेतल्यानंतर अनेक जण या कर्जाचा बोजा हा कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची शक्कल लढवण्यात प्रयत्न करत असतात. तसेच हे लोन कसे लवकरात लवकर कमी करता येईल याचा प्रयत्न देखील सुरु असतो. तसे पाहायला गेले तर होम लोनचे कर्ज चुकवायला आपल्याला दीर्घ काळाचा अवधी मिळत असतो या दरम्यान आपल्याला व्याज (Interest Payment) सुद्धा जास्त द्यावे लागते. ग्राहक या व्याजाच्या ओझ्यापासून वाचण्यासाठी बॅलन्स ट्रान्सफर पासून ते प्री पेमेंट सारखे अनेक पर्याय यांचा वापर करत असतात त्याशिवाय एक नवीन पर्याय सुद्धा उपलब्ध असतो ज्यामध्ये होम लोन सोबतच ओव्हर ड्राफ्ट सुविधा दिली जाते. असे ग्राहक ज्यांना अतिरिक्त पैशांची आवश्यकता असते त्यांच्यासाठी ओवरड्रॉफ्ट सुविधा (Overdraft Limit with Home Loan) खूपच लाभदायक ठरते. आयसीआयसीआय बँकेने आपल्या एका ब्लॉग मध्ये आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की विविध प्रकारे ही सुविधा ग्राहकांना सहाय्य करते आणि याबद्दल असे नेमके फायदे काय काय आहेत या सगळ्या माहितीबद्दल त्यांनी ब्लॉगमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे.

होम लोन वर ओव्हरड्राफ्ट सुविधेसोबतच ग्राहकांना हा एक पर्याय सुद्धा प्राप्त होतो जेथे अतिरिक्त रक्कम तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करू शकता. ज्यामुळे तुमच्या होम लोन वरील कर्जाची रक्कम आणि व्याज कमी करण्यासाठी मदत होते. खरेतर प्रीपेमेंट सुविधेपेक्षा थोडी वेगळी असलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधांमध्ये ग्राहक विशिष्ट रक्कम परत काढू सुद्धा शकतात. काढलेल्या रकमेवर होम लोन खात्यामध्ये जी रक्कम उरलेली आहे त्यावर व्याज कॅल्क्युलेट केले जाते. आणि त्यानुसार व्याजदर लावला जातो.

अशा प्रकारे काम करते ओव्हरड्राफ्ट सुविधा

ओवरड्राफ्ट सुविधाची मागणी केल्यानंतर तुमच्या लोन अकाऊंटला तुमच्या करंट किंवा सेविंग अकाउंट सोबत जोडले जाते. जर तुम्ही या खात्यामध्ये ईएमआय पेक्षा अतिरिक्त रक्कम टाकू इच्छित आहात तर या आधारावर जे काही व्याज असते ते हळूहळू कमी होते आणि व्याजाचे ओझे सुद्धा घटू लागते. तुम्ही जेवढी रक्कम या खात्यामध्ये भरत जाल तितकी तुमची प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच मुद्दल देखील कमी होत जाते. तुम्हाला गरज असल्यास तुम्ही ही रक्कम पुन्हा काढू शकता सुद्धा शकता. जेव्हा तुम्ही रक्कम काढता तेव्हा तुम्हाला ती रक्कम व्याजासकट परत करावी लागते. कारण ती रक्कम जमा करणे यावर तुमची प्रिन्सिपल अमाउंट म्हणजेच मुद्दल आणि व्याज सुद्धा वाढते ज्याला तुम्हाला बॅलन्स करणे गरजेचे आहे.

अन्य पर्यायाच्या तुलनेमध्ये OD चे नेमके काय आहेत फायदे आणि तोटे

ओडी लिमिट द्वारे ग्राहक थोडी अतिरिक्त रकम सोबत आपल्या अतिरिक्त कर्जाचा बोजा कमी करू शकतात सोबतच जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर अशावेळी तुम्ही ते पैसे काढू सुद्धा शकता. ही सुविधा लोन लवकर समाप्त करण्यासाठी अन्य पर्यायमध्ये आपल्याला मिळत नाही. होम लोन जर आपण वेळेआधीच पूर्ण केले तर अशा वेळी अनेकदा आपल्याला पेनल्टी सुद्धा बसते. तसे पाहायला गेले तर ओडी लिमिटमध्ये आपल्याला अशा प्रकारची कोणतीही पेनल्टी बसत नाही त्याचबरोबर दुसरीकडे ओडी लिमिट एक अतिरिक्त सुविधा आहे जेथे व्याजाचे दर होम लोन सामान्य लोनच्या तुलनेत जास्त असते.ओडी लिमिट बद्दल प्रत्येक बँकेचे स्वतःचे असे वेगळे काही नियम असतात.

इतर बातम्या

‘या’ चार बँकांनी केलेत त्यांच्या नियमावलीत बदल, खातेधारकांनी जाणून घेणे महत्त्वाचे…

विदेशी कंपन्यांमधील जाहिराती आकर्षित करतात मात्र, पैसे गुंतवण्यापूर्वी हे जाणून घ्या

पॅकेजिंग क्षेत्रातील ‘या’ कंपनीने वर्षभरात दिला 100 टक्क्यांहून अधिक परतावा, तज्ज्ञांकडून शेअर खरेदीचा सल्ला

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.