AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Honey Trap : पुण्यात हनी ट्रॅप, सोशल मीडियातून ओळख, प्रेमाचे नाटक, मग धमकावत तरुणाकडून 67 लाख उकळले

अक्षयची सदर तरुणीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर तरुणीने त्याला बलात्काराची धमकी देत तब्बल 67 लाख रुपये उकळले.

Honey Trap : पुण्यात हनी ट्रॅप, सोशल मीडियातून ओळख, प्रेमाचे नाटक, मग धमकावत तरुणाकडून 67 लाख उकळले
पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तरुणाला लुटलेImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Jul 29, 2022 | 4:30 PM
Share

पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून मग बलात्कारा (Rape)चा गुन्हा दाखल करण्याची धमकी (Threat) देत पुण्यात तरुणीने एका तरुणाकडून तब्बल 67 लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. अक्षय तांबे असे पीडित असे तरुणाचे नाव आहे. अक्षयची सदर तरुणीसोबत सोशल मीडिया (Social Media)च्या माध्यमातून ओळख झाली होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर तरुणीने त्याला बलात्काराची धमकी देत तब्बल 67 लाख रुपये उकळले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तरुणीसह तिच्या दोन साथीदारांनाअटक केली आहे. चेतन रवींद्र हिंगमारे (रा. कालेपडळ, हडपसर) आणि निखिल उर्फ गौरव म्हेत्रे(27, गाडीतळ, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत.

तरुणीकडून पैशांची मागणी वाढल्याने फसवणुकीचा प्रकार लक्षात आला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि तरुणीची सोशल मीडियावर ओळख झाली होती. या दोघांमध्ये झालेली ही ओळख प्रेम आणि शरीर संबंधापर्यंत पोहचली. या तरुणीने तिच्या दोन साथीदारांसह फिर्यादीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तरुणीने आपण अल्पवयीन असून आपल्यावर तू बलात्कार केला आहे आणि यातून गर्भधारणा झाली आहे, असं सांगत तरुणाला धमकी दिली. प्रकरण मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील म्हणून त्या तरुणीने 67 लाख रुपयांची मागणी केली. समाजात बदनामी होऊ नये यासाठी त्या तरुणाने 67 लाख रुपये त्या तरुणीला दिले. मात्र त्या तरुणीने अधिक पैसे मागायला सुरुवात केली. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या तरुणाने गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित तरुणीसह तिच्या दोन साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. (Honey trap in Pune, looted lakhs of rupees from youth by threatening to file a case)

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.