AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी भारतीय सैन्यात आहे, लग्न करशील का? पुण्यातील तरुणीवर बलात्कार करुन भामटा परागंदा

बलात्कार केल्यानंतर आरोपीने आपला फोन बंद ठेवून पीडितेशी संपर्क तोडला. तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली

मी भारतीय सैन्यात आहे, लग्न करशील का? पुण्यातील तरुणीवर बलात्कार करुन भामटा परागंदा
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 8:36 AM
Share

पुणे : भारतीय सैन्य दलाच्या वर्दीचा गैरवापर करुन एका तरुणाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. आरोपीने पुण्यातील तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लष्करात असल्याचे सांगून पीडितेला लग्नाचे आमिष देत तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

प्रशांत भाऊराव पाटील असे अटक केलेल्या 31 वर्षीय आरोपीचे नाव आहे. बलात्कार केल्यानंतर आरोपीने आपला फोन बंद ठेवून पीडितेशी संपर्क तोडला. तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे तरुणीशी संपर्क

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत याने एका प्रसिद्ध मॅट्रिमोनियल वेबसाईटद्वारे पुण्यात तरुणीशी संपर्क साधला होता. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांच्या अंतर्गत प्रशांतवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

तरुणीची फसवणूक, चेन्नईतील आरोपीला अटक

दुसरीकडे, प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज डिकृज या आरोपीला अटक केली होती. तो मूळ तामिळनाडूतील चेन्नईचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली होती.

संबंधित बातम्या :

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाचा बनाव रचून तरुणीची 11 लाखांना फसवणूक, चेन्नईचा ‘लखोबा लोखंडे’ पुण्यात गजाआड

8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त

नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या ‘सासरी’ अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.