AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाचा बनाव रचून तरुणीची 11 लाखांना फसवणूक, चेन्नईचा ‘लखोबा लोखंडे’ पुण्यात गजाआड

आरोपी प्रेमराज थेवराजने दोन-तीन महिने चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारुन ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले.

मॅट्रिमोनियल साईटवर ओळख, लग्नाचा बनाव रचून तरुणीची 11 लाखांना फसवणूक, चेन्नईचा 'लखोबा लोखंडे' पुण्यात गजाआड
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 22, 2021 | 2:55 PM
Share

पिंपरी चिंचवड : प्रसिद्ध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल बनवत देशभरातील विवाहोच्छुक तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील निगडी पोलिसांनी प्रेमराज थेवराज डिकृज या आरोपीला अटक केली. तो मूळ तामिळनाडूतील चेन्नईचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी प्रेमराज थेवराजने दोन-तीन महिने चिंचवडमधील एका उच्चशिक्षित तरुणीशी गप्पा मारुन ओळख वाढवली. तिचा विश्वास संपादन करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लाखो रुपये उकळले. आपल्याला पैशांची गरज असल्याचं सांगून त्याने तिच्याकडे बारा लाख रुपयांची मागणी केली.

भावी पतीच्या खात्यावर 11 लाख ट्रान्सफर

मी रेल्वे काँट्रॅक्टर आहे. लॉकडाऊन असल्याने कामगारांचे पैसे दिले नाहीत, तर रेल्वे कंत्राट रद्द करेल, असे त्याने खोटे सांगितले. त्याच्या थापांना भुलून तरुणीने आपल्या भावी पतीच्या बँक खात्यावर तब्बल 11 लाख 4 हजार 500 रुपये पाठवले. एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्याशी लग्न करण्याचा बनाव रचला.

चेन्नईला बोलावून लग्नाचं नाटक

लग्नासाठी प्रेमराजने फिर्यादी तरुणीला चेन्नईला बोलावले. त्यामुळे तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत चेन्नईला गेली. तिथे त्याने आपला मित्र रजिस्टर ऑफिसमध्ये असल्याचे भासवून तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचा बनाव रचला. त्यानंतर तरुणी पुण्याला परत आली.

80 लाखांचे वैयक्तिक कर्ज काढण्याची गळ

दहा बारा दिवसांनी आरोपीने तिला लग्नाचे खोटे प्रमाणपत्र पाठवले आणि 80 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढून देण्याची मागणीही आरोपीने तरुणीकडे केली. तिने नकार देताच आरोपीने तिच्या आई-वडिलांच्या जीवाचे बरे वाईट करण्याची धमकी दिली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने निगडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. याचा तपास करताना निगडी पोलिसांना प्रेमराज थेवराज या आरोपीने अनेक महिलांची फसवणूक केल्याचे लक्षात आले.

शंभरहून अधिक महिलांना जाळ्यात ओढले

त्यानंतर तरुणीने त्याला भेटायला बोलावले. आरोपी चेन्नईहून पुण्याला विमानाने आला. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून त्याला पुणे विमाननगर परिसरात अटक केली. आरोपीकडून विविध कंपन्यांचे सात मोबाईल, तेरा सिमकार्ड, चार एटीएम कार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याने शंभरहून अधिक महिलांना संपर्क साधला असून अनेक जणींशी साखरपुड्याचे नाटक करत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या :

8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त

नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या ‘सासरी’ अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उस्मानाबादेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह पळाली, नांदेडमध्ये बेड्या

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना