उस्मानाबादेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह पळाली, नांदेडमध्ये बेड्या

उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबीतील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी नांदेडच्या वधूसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी लघुशंकेच्या बहाण्याने नववधू विवाहातील दागिन्यांसह तिच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पसार झाली होती.

उस्मानाबादेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू दागिन्यांसह पळाली, नांदेडमध्ये बेड्या
यंदा लग्नाचा हंगाम केवळ 15 दिवसांचा, जाणून घ्या तारखा आणि शुभ मुहूर्त
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 1:13 PM

उस्मानाबाद : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू विवाहातील दागिन्यांसह पसार झाल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये उघडकीस आली आहे. लघुशंकेच्या बहाण्याने नववधू विवाहातील दागिन्यांसह आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पळून गेली होती. मात्र पोलिसांनी नववधूसह चौघांना नांदेडमध्ये अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

उस्मानाबाद जिल्ह्यातील अंबीतील तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी नांदेडच्या वधूसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अंबी येथील विश्वनाथ भोसले या तरुणाचा विवाह नांदेड येथील एका तरुणीसोबत 18 सप्टेंबरला झाला. दुसऱ्या दिवशी लघुशंकेच्या बहाण्याने नववधू विवाहातील दागिन्यांसह तिच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पसार झाली होती. मात्र उस्मानाबाद पोलिसांनी तातडीने कारवाई करत एकूण चौघा जणांना नांदेड येथून अटक केली आहे.

पंजाबची दरोडेखोर वधू

दुसरीकडे, एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ लग्न करुन सासरच्या मंडळींना गंडवणारी ‘दरोडेखोर’ वधू अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. सासरच्या घरातून दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या तरुणीसह चौघा जणांना अटक झाली आहे. मात्र या वधूबाबत समोर आलेल्या माहितीमुळे पोलिसांचीच झोप उडाली आहे. कारण या तरुणीची पोलिसांनी एचआयव्ही चाचणी केली होती. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता पोलीस तिच्याशी लग्न केलेल्या सर्व वरांचीही एचआयव्ही चाचणी घेणार आहेत.

काय होती मोडस ऑपरेंडी

‘दरोडेखोर’ वधू टोळीतील तिच्या 3 साथीदारांसह तरुणांना गंडा घालत असे. लग्नानंतर, सासरच्यांनी मारहाण आणि हुंडा मागितल्याची तक्रार करत तरुणी आकांडतांडव करायची. त्यानंतर पंचायत बोलावायची. या काळात संधी मिळताच ती सासरच्या कुटुंबातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून जायची. या कामात तिची आई सुद्धा तिला साथ देत असे.

आठवड्याभरात गाशा गुंडाळायची

फसवणूक झालेले 8 पैकी 3 नवरदेव हरियाणाचे आहेत. पटियालाच्या जुल्का परिसरात नवव्या वराचा शोध घेत असताना तिला पकडण्यात आले. जिथे तिचे लग्न व्हायचे, तिथे ती सुहागरात किंवा हनिमूननंतर फार फार तर एक आठवडा राहून घरी परत यायची. अशा परिस्थितीत तिच्याकडून फसवणूक झालेल्या वरांनाही एड्सचा धोका निर्माण झाला आहे.

कोण आहे ही दरोडेखोर वधू

आरोपी महिला हरियाणाच्या कैथल जिल्ह्यातील रहिवासी असून तिचे वय 30 वर्षे आहे. आरोपी महिलेचे खरे लग्न 2010 मध्ये पटियाला येथे झाले, या लग्नातून तिला तीन मुलं झाली. त्यांचं वय आता 7 ते 9 वर्षांच्या दरम्यान आहे. यानंतर अचानक तिचा नवरा गायब झाला. या वधूने आपल्या पतीला घटस्फोटही दिला नाही. चार वर्षांपूर्वी तिने दरोडेखोरीची टोळी सुरु केली, त्यानंतर पंजाब आणि हरियाणातील अविवाहित, घटस्फोटित किंवा विधुर पुरुषांना अडकवून त्यांची फसवणूक सुरू केली.

संबंधित बातम्या :

8 नवऱ्यांसोबत सप्तपदी, नवव्या लग्नासाठी सावजाचा शोध, ‘दरोडेखोर’ वधू निघाली एड्सग्रस्त

नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या ‘सासरी’ अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पसार, चार लाखांच्या दागिन्यांसह सासरहून पोबारा

लग्नानंतर 15 दिवसातच नववधू प्रियकरासोबत पसार, दीड लाखांच्या दागिन्यांसह पोबारा

लग्नानंतर चौथ्या दिवशी नववधूचा फोटोग्राफरसोबत पोबारा

Non Stop LIVE Update
महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार? छगन भुजबळ यांच्या डोक्यात चाललंय काय?
महायुतीतून भुजबळ बाहेर पडणार? छगन भुजबळ यांच्या डोक्यात चाललंय काय?.
दावा ठोकणार आता थेट कोर्टात बोलाव, बच्चू कडूंचं रवी राणांना थेट आव्हान
दावा ठोकणार आता थेट कोर्टात बोलाव, बच्चू कडूंचं रवी राणांना थेट आव्हान.
विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा? मविआचे 3 फॉर्म्युले
विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा? मविआचे 3 फॉर्म्युले.
ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात
ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.