लग्नानंतर 15 दिवसातच नववधू प्रियकरासोबत पसार, दीड लाखांच्या दागिन्यांसह पोबारा

पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला

लग्नानंतर 15 दिवसातच नववधू प्रियकरासोबत पसार, दीड लाखांच्या दागिन्यांसह पोबारा
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 4:42 PM

अहमदनगर : लग्नानंतर अवघ्या 15 दिवसातच नववधूने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने सासरच्या घरातील दीड लाखांचे दागिने घेऊन पोबारा केला. अहमदनगरमध्ये घडलेल्या या प्रकाराने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Newly wed wife run away with boyfriend in Ahmednagar)

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदामध्ये लग्न करुन आलेली बारामतीची तरुणी दोन आठवड्यातच पळून गेली. घरातील एक लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन ती पसार झाली.

हेही वाचा : दोन वर्ष प्रेमसंबंध, पळून लग्न, 12 तासानंतर प्रेयसीकडून प्रियकराला घटस्फोट

या प्रकरणी पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी प्रियकरासोबत आळंदीला पळाली असून तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा : लग्नानंतर देवदर्शनाला गेलेली नवरी प्रियकरासोबत पळाली

बारामती तालुक्यातील तरुणीचा विवाह 25 जूनला श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे राहणाऱ्या युवकाशी झाला होता. लग्नापूर्वीच तिचे तरडोली गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे बोलले जाते. त्यानंतर 11 जुलैला पतीच्या घरातून जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार झाली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान, लग्नानंतर नवऱ्यासोबत देवदर्शनाला गेल्यानंतर नवविवाहिता चक्क प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना वर्षभरापूर्वी अहमदनगरमध्येच समोर आली होती. देवदर्शन आटोपल्यानंतर पती गाडी पार्किंगमधून काढण्यासाठी गेला. तिथे आधीच आलेल्या नवरीच्या प्रियकराने ही संधी साधली. त्याने आपल्या विवाहित प्रेयसीला बाईकवर बसवून धूम ठोकली होती. (Newly wed wife run away with boyfriend in Ahmednagar)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.