AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौंदर्य असं की निर्मात्यांची लागायची लाईन, इंडस्ट्रीत येताच बदललं नाव, पण 36 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या सौंदर्याचे होते लाखो चाहते. आजही तिचे नाव प्रत्येक व्यक्तीच्या तोंडावर. पण तिचा वैयक्तिक आयुष्यात केला मात्र प्रचंड संघर्ष. कोण आहे ती अभिनेत्री?

सौंदर्य असं की निर्मात्यांची लागायची लाईन, इंडस्ट्रीत येताच बदललं नाव, पण 36 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 14, 2026 | 12:34 PM
Share

Madhubala Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मधुबाला या नावाला आजही अपार प्रेम मिळत आहे. सौंदर्य आणि नजाकतीची ओळख बनलेल्या मधुबालाच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र संघर्ष, जबाबदाऱ्या आणि कठीण परिस्थितींचा सामना होता. या सर्व अडचणींवर मात करत तिने यशाचा शिखर गाठला आणि हिंदी सिनेमात आपली अमिट छाप सोडली.

14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्ली येथे एका पश्तून मुस्लिम कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे खरे नाव मुमताज जहां बेगम देहलवी होते. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने लहान वयातच तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. अभिनयाची वाट तिने छंद म्हणून नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी निवडली होती.

वयाच्या अवघ्या नऊव्या वर्षी तिने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्या काळात एका लहान मुलीसाठी कॅमेऱ्यासमोर उभे राहणे सोपे नव्हते; परंतु परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तिने धैर्याने हे पाऊल उचलले. 1942 साली प्रदर्शित झालेल्या बसंत या चित्रपटातून तिच्या कारकिर्दीला खरी दिशा मिळाली. याच चित्रपटानंतर तिचे नाव मुमताजवरून ‘मधुबाला’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करत अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण केली. निर्मात्यांची त्या पहिली पसंती बनली आणि तिच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सचा ओघ सुरू झाला.

स्वत: ठरवायची मानधन

1950 चे दशक हे मधुबालाच्या कारकिर्दीचे सुवर्णयुग मानले जाते. महल, तराना, हावड़ा ब्रिज, चलती का नाम गाड़ी आणि हाफ टिकट यांसारख्या चित्रपटांनी तिला सुपरस्टारचा दर्जा मिळवून दिला. रोमँटिक, भावनिक किंवा विनोदी भूमिका असो त्या प्रत्येक भूमिकेला तिने सहजसुंदर सादरीकरणाने खुलवले. त्या काळात अभिनेत्रींसाठी भूमिका मर्यादित असतानाही मधुबालाने स्वतःच्या अटींवर काम केले आणि आपले मानधनही स्वतः ठरवले.

तिच्या यशाचा सर्वोच्च टप्पा म्हणजे मुगल-ए-आजम हा चित्रपट. हिंदी सिनेमातील ऐतिहासिक चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती गंभीर हृदयविकाराने त्रस्त होती. तरीही तिने चित्रीकरण पूर्ण केले. अनेकदा सेटवर तिची तब्येत बिघडत असे; मात्र कामाबद्दलची निष्ठा तिने कधीही कमी होऊ दिली नाही.

Follow Us
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर; ज्ञानेश कुमारांच्या....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर जनसागर;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?