दोन वर्ष प्रेमसंबंध, पळून लग्न, 12 तासानंतर प्रेयसीकडून प्रियकराला घटस्फोट

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला (after wedding wife give divorce to husband) आहे.

after wedding wife give divorce to husband, दोन वर्ष प्रेमसंबंध, पळून लग्न, 12 तासानंतर प्रेयसीकडून प्रियकराला घटस्फोट

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या हमीरपूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला (after wedding wife give divorce to husband) आहे. येथील मौदहा गावात राहणाऱ्या एका प्रेमीयुगुलाचे दोन वर्ष अफेअर सुरु होते. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. यामध्ये तरुणीने घरातल्यांच्या विरोधात जाऊन आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. पण 12 तासानंतर प्रेयसीने प्रियकराला घटस्फोट दिला आणि लग्न (after wedding wife give divorce to husband) मोडले.

कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सरिताचे (नावात बदल केला आहे) तिचा मित्र संदीपसोबत प्रेमसंबंध होते. जेव्हा सरिताच्या कुटुंबियांना तिच्या अफेअरबद्दल समजले. तेव्हा त्यांनी मुलीवर दबाव टाकला. सरितानेही कुटुंबाच्या दबावामुळे संदीपवर लैंगिक शोषणाचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संदीपला पोलिसांनी अटक केली होती. पण काही तासांनी तरुणीने आपली तक्रार मागे घेतली.

जेव्हा तरुणीने तक्रार मागे घेतली तेव्हा कुटुंबियांनी नाराज होऊन तिला घरातून बाहेर काढले. त्यानंतर तरुणी पुन्हा संदीपकडे गेली आणि तिने तिच्या कुटुंबियांना संदीपसाठी मनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत सोमवारी (17 फेब्रुवारी) मंदिरात लग्न झाले.

लग्न झाल्यानंतर मुलीचे मन बदलले आणि तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर संदीपही तरुणीच्या या गोष्टीमुळे कंटाळला होता. त्यासाठी त्यानेही तरुणीचा निर्णय स्विकारला. दोघेही मौदहा कोतवाली पोहोचले आणि त्यांनी आपले लग्न पूर्णपणे मोडले.

“मी तिच्या वागण्याला कंटाळलो होतो. मी तिच्यावर प्रेम करत होतो. पण मला हेच कळत नव्हते की तिला नेमके काय पाहिजे होते. आता मी या सर्वातून मुक्त झालो आहे”, असं तरुणाने सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *