AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Video | पुण्यात गुंडांचा उच्छाद, फुकट भाजी न दिल्याने तरुणाला पाया पडायला लावलं

या घटनेचे चार व्हिडीओ समोर आले आहेत. भाजी विक्रेत्या तरुणाला त्याच्या आईसमोरच कपडे फाटेस्तोवर मारहाण करत पाया पडायला लावल्याचं एका व्हिडीओत दिसत आहे.

Pune Video | पुण्यात गुंडांचा उच्छाद, फुकट भाजी न दिल्याने तरुणाला पाया पडायला लावलं
पुण्यात गुंडांचा हैदोसImage Credit source: टीव्ही9
| Updated on: Apr 04, 2022 | 12:24 PM
Share

पुणे : पुण्यात गुंडांच्या (Pune Crime) दादागिरीचे व्हिडीओ अनेक वेळा समोर येताना दिसतात. धनकवडी परिसरात गुंडांनी भाजी विक्रेत्याला पाया पडायला (Goons) लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फुकट भाजी दिली नाही, म्हणून गुंडांनी भाजीवाल्याला लोटांगण घालायला लावल्याची माहिती आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन गुंडांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. धनकवडी भागात बालाजी नगर येथील रजनी कॉर्नरजवळ घडलेल्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

या घटनेचे चार व्हिडीओ समोर आले आहेत. भाजी विक्रेत्या तरुणाला त्याच्या आईसमोरच कपडे फाटेस्तोवर मारहाण करत पाया पडायला लावल्याचं एका व्हिडीओत दिसत आहे. बालाजी नगरमधील गुलमोहर अपार्टमेंटसमोर हा प्रकार घडला.

कोयते दाखवून दहशत माजवली

दुसऱ्या व्हिडीओमध्ये बाईकस्वार गुंडांनी अन्य दुचाकीवर बसलेल्या तरुणावर हल्ला केल्याचं दिसतं. हातात कोयते घेऊन ही टोळी दहशत माजवताना दिसत आहे. असे प्रकार परिसरात सर्रास घडत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेऊन पोलीस तक्रार दाखल करणार आहेत. पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

Ambernath | आईला मारहाण करणाऱ्या दारुड्या बापावर पोरांचा संताप, एकदाची अद्दल घडवली

Bar Dancer Attacked | मुंबईत बारबालेसह बहिणीवर ब्लेड हल्ला, एक्स बॉयफ्रेण्ड पसार

Kolhapur CCTV | रस्त्याने शांतपणे चाललेली महिला, कुत्रा मागून धावत आला आणि लचके तोडले

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.