AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bar Dancer Attacked | मुंबईत बारबालेसह बहिणीवर ब्लेड हल्ला, एक्स बॉयफ्रेण्ड पसार

बारबाला शुक्रवारी रात्री बहिणीसोबत चारकोप येथील घरात पोहोचली, तेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेण्ड इमारतीखाली आधीच उपस्थित होता.आरोपीने आधी प्रेयसीवर ब्लेडने वार केले

Bar Dancer Attacked | मुंबईत बारबालेसह बहिणीवर ब्लेड हल्ला, एक्स बॉयफ्रेण्ड पसार
बारबाला आणि बहिणीवर हल्लाImage Credit source: टीव्ही9
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 02, 2022 | 10:39 AM
Share

मुंबई : मुंबईतील चारकोप येथे राहणारी बारबाला (Bar Dancer Attacked) आणि तिच्या बहिणीवर ब्लेड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या माजी प्रियकराने दोघींवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. आरोपी आणि बारबाला हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ते एकमेकांचे चांगले मित्र होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून बारबालेचे आरोपीसोबत संबंध दुरावले होते आणि ते एकमेकांशी बोलतही नव्हते. याच रागातून दोघी बहिणींवर हल्ला (Mumbai Crime) झाल्याचा संशय आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारबाला शुक्रवारी रात्री बहिणीसोबत चारकोप येथील घरात पोहोचली, तेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेण्ड इमारतीखाली आधीच उपस्थित होता.आरोपीने आधी प्रेयसीवर ब्लेडने वार केले आणि नंतर पीडितेला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीवर हल्ला करुन तो फरार झाला.

तीन वर्षांपासून दोघांची ओळख

पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की, आरोपी आणि बारबाला हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बारबालेने आरोपीसोबत संबंध कमी केले, तसेच ते बोलतही नव्हते.

दोघींवर हल्ला करुन आऱोपीचा पळ

शुक्रवारी रात्री बारबाला आपल्या बहिणीसह इमारतीत पोहोचताच तिच्या माजी प्रियकराने दोघींवर ब्लेडने वार करुन तिथून पळ काढला. सध्या चारकोप पोलीस आरोपी संजय सुर्वेविरुद्ध भादंवि 354 आणि 324 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपीचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

Kolhapur CCTV | रस्त्याने शांतपणे चाललेली महिला, कुत्रा मागून धावत आला आणि लचके तोडले

भावकीतील वाद, जंगलात दबा धरुन तलवार हल्ला, तिघे गंभीर जखमी

सिगरेटचा धूर मोहोळापर्यंत, पुण्यात आयटी तरुणांच्या ग्रुपवर मधमाश्यांचा हल्ला

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...