AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Video | पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगची धिंड? म्होरक्यासह सात जणांच्या मुसक्या आवळल्या

सलमान शेख आणि त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. सहकार नगर पोलिसांनी आरोपींची धिंड काढल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

Pune Video | पुण्यात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगची धिंड? म्होरक्यासह सात जणांच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात कोयता गँगची धिंड?Image Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 07, 2022 | 8:29 AM
Share

पिंपरी चिंचवड : पुण्यातील सहकार नगर परिसरात दहशत माजवणाऱ्या (Pune Crime News) कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढल्याचा दावा केला जात आहे. नुकतंच पोलिसांनी हातात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या गँगच्या (Criminal Gang) मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर सहकार नगर पोलिसांनी आरोपींची ‘वरात’ काढल्याचं समोर आलं आहे. हातात कोयते घेऊन तरुणांना धमकावण्याचे प्रकार सुरु होते. एका तरुणाला दोन दिवसांपूर्वी मारहाण झाल्याचं उघडकीस आलं होतं. त्यानंतर सलमान शेख आणि त्याच्या सहा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. सहकार नगर पोलिसांनी आरोपींची धिंड काढल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.

काय आहे प्रकरण?

बालाजी नगर येथील रजनी कॉर्नर परिसरात धारदार हत्यार हातात घेऊन दहशत पसरावली जात आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण केली जात आहे, पाया पडायला लावलं जात आहे आणि या घटनांचे व्हिडीओ शूट करुन दहशत पसरवली जात आहे. याबाबत नागिरकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु पुणे पोलिस कडक कारवाई करत नसल्याचं बोललं जात होतं.

बालाजीनगरमधले अट्टल चोर धारदार हत्याराने नागरिक आणि लहान मुलांना त्रास देण्याचं काम करत होते. रस्त्यावर महिला जात असताना छेडछाड करणे, व्हिडीओ काढणे अशा पद्धतीची दहशत पसरवत होते. परिसरातील नागरिकांनी सहकारनगर पोलिस स्टेशनकडे वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत. मात्र त्यांना पोलिसांचीही भीती उरली नसल्याचं स्थानिक सांगत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पुण्याचा बिहार व्हायला सुरुवात, पुण्यात गुंडाचा हैदोस, दहशत पसरवण्यासाठी व्हिडीओचा वापर

‘आमच्या गॅंगसोबत का राहत नाहीस?’ पुण्यात तरुणाला मारहाण करणारा गुंड जेरबंद

Pune Video | पुण्यात गुंडांचा उच्छाद, फुकट भाजी न दिल्याने तरुणाला पाया पडायला लावलं

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.