तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून खेळच संपवला

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून खेळच संपवला
पूजा लाकमाने

अवघ्या काही दिवसांत गोडीगुलाबीत सुरु असलेल्या त्यांच्या संसारात खटके उडू लागले. | Murder wife

Rohit Dhamnaskar

|

May 29, 2021 | 9:53 AM

पुणे: पुण्यातील देहूगावात एका नवविवाहित जोडप्यात झालेल्या भांडणातून खून (Murder) झाल्याची घटना समोर आली आहे. अगदी किरकोळ भांडणाच्या रागातून पतीने आपल्या पत्नीचा खून केला. पूजा वैभव लाकमाने असे मयत तरुणीचे नाव आहे. (Husband killed wife in Pune)

पूजा आणि वैभव यांनी तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. त्यानंतर हे दोघे देहूगावामधील साई नगरी, वडाचा मळा याठिकाणी ते राहत होते. मात्र, अवघ्या काही दिवसांत गोडीगुलाबीत सुरु असलेल्या त्यांच्या संसारात खटके उडू लागले. पूजा आणि वैभव यांच्यात काही दिवसांपूर्वीच जोरदार भांडण झाले होते. यावेळी पूजाने वैभवला आईवरुन शिवी दिली. ही शिवी दिल्याचा राग मनात धरून पती वैभवने पत्नीचा गळा दाबून खून केला. या घटनेनंतर पोलिसांनी वैभवला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला

काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये सुनेने सासूची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला होता. हत्येनंतर सासूचा मृतदेह पोत्यात भरुन सूनेने झुडपात फेकला होता. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी मुलगा-सूनेला अटक केली आहे. हत्येच्या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली होती.

संबंधित बातम्या:

आईच्या प्रियकराचा मुलींवर अनेकदा बलात्कार, दुसरीकडे बाप मुलींना विकायला निघाला, गुंतागुंतीचं किळसवाणं कृत्य अखेर उघड

तृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंधांची मागणी, मुंबईत तरुणाची हत्या, आरोपी एकाच कुटुंबातील चौघे

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यातील घरी चाकूहल्ला

(Husband killed wife in Pune)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें