तृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंधांची मागणी, मुंबईत तरुणाची हत्या, आरोपी एकाच कुटुंबातील चौघे

36 वर्षीय सुहेल अहमद शाह गोवंडी भागातील बैंगनवाडी परिसरात जखमी अवस्थेत आढळला होता (Mumbai Man sexual favors eunuch)

तृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंधांची मागणी, मुंबईत तरुणाची हत्या, आरोपी एकाच कुटुंबातील चौघे
मुंबईत सहा जणांकडून तरुणाची हत्या

मुंबई : तृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंधांची मागणी केल्याने मुंबईत तरुणाची हत्या करण्यात आली. हत्येप्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतील गोवंडी भागातील बैंगनवाडी परिसरात हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे अटक झालेल्या सहा आरोपींपैकी चौघे जण हे एकाच कुटुंबातील आहेत. (Mumbai Man stabbed to death for demanding sexual favors from eunuch)

मद्यधुंद अवस्थेत तृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंधाची मागणी

36 वर्षीय सुहेल अहमद शाह गोवंडी भागातील बैंगनवाडी परिसरात जखमी अवस्थेत आढळला होता. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी सुहेलला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुहेलने कायनाथ नावाच्या तृतीयपंथीयाला फोन करुन बोलवले होते. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेतच त्याने तृतीयपंथीयाकडे लैंगिक संबंध ठेवण्याबाबत मागणी केली होती.

तृतीयपंथीयाच्या मैत्रिणीच्या कुटुंबाकडून मारहाण

त्यानंतर कायनाथची मैत्रीण शहनाज, तिचा नवरा इरफान, त्यांची मुलगी आफ्रीन, मुलगा अवेश आणि इतर दोन नातेवाईक आशू आणि समीर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुहेलला मारहाण केली. एका आरोपीने सुहेलला सुरीने भोसकले. त्यानंतर सर्वांनीच घटनास्थळावरुन पोबारा केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत सहाही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत शोधून हत्या

दरम्यान, इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत सर्च करुन नवऱ्याने पत्नीला जीवे मारल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच विरारमध्ये उघडकीस आला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणी 35 वर्षीय तरुणाला अटक केली. मयत महिला आणि आरोपी दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या :

इंटरनेटवर हत्या करण्याची पद्धत सर्च, दुसऱ्या पत्नीला जीवे मारलं, विरारमध्ये तरुणाला अटक

पत्नीसोबत मित्राचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीने राहत्या घरातच मित्राचा काटा काढला

(Mumbai Man stabbed to death for demanding sexual favors from eunuch)

Published On - 1:00 pm, Fri, 28 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI