AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीसोबत मित्राचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीने राहत्या घरातच मित्राचा काटा काढला

घरातील हातोडी, भाजी कापायचा चाकू आणि स्टिलच्या झारा याने डोक्यावर, पाठीवर वार करुन आरोपीने मित्राची हत्या केली (Husband Kills Friend Extra Marital Affair)

पत्नीसोबत मित्राचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीने राहत्या घरातच मित्राचा काटा काढला
नालासोपाऱ्यात तरुणाची हत्या
| Updated on: May 25, 2021 | 7:41 AM
Share

नालासोपारा : तरुणाने आपल्या मित्राचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नालासोपारा भागातील राहत्या घरीच आरोपीने आपल्या मित्राला संपवलं. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. (Husband Kills Friend in Nalasopara Suspecting Extra Marital Affair with Wife)

घरातील अवजारांनीच हल्ला

नालासोपारा पूर्व आचोळे डोंगरी भागात ही घटना घडली. आरोपी संदीप साहू याने त्याच्या रहात्या घरातच दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मित्र राहुल याची हत्या केली. घरातील हातोडी, भाजी कापायचा लांब चाकू आणि स्टिलच्या झारा याने डोक्यावर, पाठीवर, अंगावर ठिकठिकाणी वार करुन हत्या केली आहे.

आरोपीच्याच घरात राहायचा मित्र

मयत राहुल हा आरोपी संदीप साहूच्या घरीच राहायचा. राहुलचे आपल्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा त्याला संशय होता. याच संशयातून संदीपने राहुलची निर्घृण हत्या केली. तुळींज पोलिसांनी आरोपी संदीपला अटक केला आहे. त्याच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हत्या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

मुंबईत सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार

सहकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेव्ही अधिकाऱ्याला चारच दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. मुंबईत एकाच फ्लॅटमध्ये नौदलातील दोघे अधिकारी राहत होते. आरोपीने फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आपल्या सहकाऱ्याच्या पत्नीवर गेल्या महिन्यात लैंगिक अत्याचार केला. मात्र धमक्यांच्या भीतीने गप्प बसलेल्या विवाहितेने अखेर धीर एकवटून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

नेमकं काय झालं?

29 एप्रिल रोजी आरोपीला प्रमोशन मिळालं होतं. त्यावेळी त्याने पीडितेला दुबईहून आणलेली चॉकलेट्स दिली. त्यानंतर आरोपीने मद्यपान केले. डोकं दुखत असल्यामुळे पीडिता स्वतःच्या बेडरुममध्ये पेन किलर घेऊन झोपली. त्यावेळी आरोपी हेड मसाज देण्याच्या बहाण्याने तिच्या खोलीत आला.

आरोपीची पीडितेला धमकी

डोक्याला मसाज करतानाच मद्यधुंद अवस्थेत त्याने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे. तिने हा प्रकार आपल्या पतीला सांगणार असल्याचं म्हटलं. तेव्हा आरोपीने गोळी झाडून आत्महत्या करण्याची धमकी दिली. इतकंच नाही, तर पीडितेच्या पतीला या गुन्ह्यात खोटं अडकवण्याचाही इशारा दिला. त्यामुळे पीडिता घाबरली आणि तिने नस कापून घेण्याचाही प्रयत्न केला.

अखेर तिने धीर एकवटून घडलेला प्रकार फोनवर नवऱ्याला सांगितला. गेल्या आठवड्यात तिचा पती केरळहून मुंबईला आला. त्यानंतर त्याने नेव्ही पोलिसात तक्रार केली. अखेर कफ परेड पोलिसात गुन्हा दाखल करुन आरोपी नौदल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या :

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

वर्षभरापूर्वी पतीचं निधन, आता दिराने वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन संपवलं!

(Husband Kills Friend in Nalasopara Suspecting Extra Marital Affair with Wife)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.