AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक, रत्नागिरीत सिद्धार्थला बेड्या

तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थ बनसोडेवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Anna Bansode Son arrested)

पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक, रत्नागिरीत सिद्धार्थला बेड्या
अण्णा बनसोडे (उजवीकडे) आणि पुत्र सिद्धार्थ
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 27, 2021 | 11:31 AM
Share

पिंपरी चिंचवड : पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्या मुलाला अखेर अटक करण्यात आली आहे. सिद्धार्थ बनसोडे (Siddharth Bansode) याला रत्नागिरीतील पावसमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तानाजी पवार यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमदार पुत्राला पकडण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा सुरु होती. (Pune Crime Pimpri Chinchwad NCP MLA Anna Bansode Son Siddharth Bansode arrested in Pawas Ratnagiri)

आरोपी तानाजी पवारकडूनच गुन्हा

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने उलट आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला.

तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना सिद्धार्थ बनसोडेचा शोध होता. अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला अटक करण्यात आली.

नेमकी तक्रार काय?

पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत देखील कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. (Anna Bansode Son arrested)

अण्णा बनसोडे गोळीबारातून वाचले

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर बुधवार 12 मे रोजी गोळीबार झाला होता. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास करण्यात आला.

अण्णा बनसोडे कोण आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापूर्वी ते 2009 मध्येही निवडून आले होते. नंतर 2014 मध्ये अण्णा बनसोडे यांचा शिवसेना उमेदवार गौतम चाबुकस्वार यांनी 2 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार गौतम चाबुकस्वार यांचा 16 हजार 856 मतांनी पराभव केला होता.

संबंधित बातम्या :

CCTV VIDEO | राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंवर गोळीबार करणाऱ्याचीच उलट तक्रार, आमदाराच्या मुलावर गुन्हा

आमदार बनसोडेंच्या मुलावर कारवाईत दिरंगाई, कृष्णप्रकाश यांची ‘आयर्नमॅन’ इमेज धोक्यात

(Pune Crime Pimpri Chinchwad NCP MLA Anna Bansode Son Siddharth Bansode arrested in Pawas Ratnagiri)

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...