sharad mohol | शरद मोहोळ याच्या हत्येपूर्वी झाडावर गोळीबारचा सराव, आता ते झाडच गायब

Sharad Mohol murder case : पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ याला मारण्यासाठी आरोपींना झाडावर गोळीबाराचा सराव केला. हे झाडच आता घटनास्थळावर नाही.

sharad mohol | शरद मोहोळ याच्या हत्येपूर्वी झाडावर गोळीबारचा सराव, आता ते झाडच गायब
sharad mohol
| Updated on: Jan 17, 2024 | 8:39 AM

पुणे, दि.17 जानेवारी 2024 | पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 रोजी हत्या झाली. या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून नवीन नवीन महिती समोर येत आहे. पोलिसांच्या तपासात मारेकऱ्यांनी शरद मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी झाडावर गोळीबारचा सराव केल्याची माहिती समोर आली होती. ऑक्टोबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात रात्री १ वाजता मुळशीमधील हाडशी येथे गोळीबाराचा सराव केला होता. झाडाच्या बुंध्यावर सहा गोळ्या झाडल्याचे मारेकऱ्यांनी सांगितले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस झाडाचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी गेले. परंतु घटनास्थळावर झाडच नाही. या प्रकरणी तपासातून आणखी काय बाहेर येणार? याकडे लक्ष लागले आहे.

पोलिसांनी केली झाडाबाबत चौकशी

झाड ज्या जागेत होते, त्या ठिकाणी पोलिसांना मिळाले नाही. यामुळे पोलिसांनी जागेचे मुळ मालक सचिन अनंता खैरे यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी दहा महिन्यांपूर्वी बांधकामादरम्यान झाड तोडल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पुणे पोलिसांनी पौड पोलीस ठाण्यात बेकायेशीरपणे पिस्टल बाळगून त्यामधून फायरिंग केल्याप्रकरणी सराव केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

खुनाच्या आधी बैठक

शरद मोहोळ खून प्रकरणी विठ्ठल शेलार आणि फरारी आरोपी गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी मोहोळच्या खुनाच्या एका महिना आधी बैठक घेतली होती, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली. या प्रकरणात आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ९ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान विठ्ठल शेलार, रामदास मारणे यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.

विठ्ठल शेलार आधीपासून रडारवर

आरोपी विठ्ठल शेलार कधीकाळी भाजपमध्ये होतो. त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. तो सुरुवातीपासून पोलिसांच्या रडारवर होता. शरद मोहोळ याचा खून झाल्यानंतर तो पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत हजर झाला होता. त्यानंतर फरार झाला. अखेर मुंबईतून त्याला अटक करण्यात आली.