AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : रिक्षातच ठोकलं… आधी गोळ्या घातल्या, मग कोयत्याने सपासप वार… मयत गणेश काळे नेमका कोण? आंदेकर टोळीशी वैर काय?

Ganesh Kale Murder Case: पुण्याच्या कोंढव्यात गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांनी सहा ते सात गोळ्या झाडण्याचे समोर आले आहे. गणेश काळे नेमका कोण आहे? याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Pune : रिक्षातच ठोकलं... आधी गोळ्या घातल्या, मग कोयत्याने सपासप वार... मयत गणेश काळे नेमका कोण? आंदेकर टोळीशी वैर काय?
Pune Crime Ganesh Kale
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Nov 01, 2025 | 6:25 PM
Share

पुण्यातील गँगवॉरने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पुण्याच्या कोंढव्यात गणेश काळे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गणेश काळेवर आंदेकर टोळीतील चार जणांनी सहा ते सात गोळ्या झाडण्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्यावर कोयत्यानेही वार केल्याचे उघड झाले आहे. मात्र भरदिवसा हत्या झालेला गणेश काळे नेमका कोण आहे? त्याचे आणि आंदेकर टोळीचे वैर नेमके काय आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कोंढव्यात घडली घटना

समोर आलेल्या माहितीनुसार, मयत गणेश काळे याच्यावर कोंढवा परिसरात रिक्षात असताना गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार देखील करण्यात आले. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात ही घटना घडली आहे. शहरात झालेल्या आणखी एका खूनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोण आहे गणेश काळे?

समोर आलेल्या माहितीनुसार, मयत गणेश काळे हा समीर काळे याचा भाऊ आहे. समीर हा सोमा गायकवाड टोळीतील सदस्य आहे. याच समीर काळेने वनराज आंदेकरच्या खूनात वापरलेली पिस्तूले मध्य प्रदेशातून आणली होती. समीर हा सध्या कारागृहात आहे. आता त्याचा भाऊ गणेश याचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

गणेश काळे हा समीर काळेचा भाऊ होता, समीरने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी पिस्तूल पुरवले होते. त्यामुळे या हत्येमागे टोळीयुद्धाची किनार असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षी सोमनाथ गायकवाड टोळीने वनराज यांचा गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केला होता, ज्यामध्ये समीर काळेचा संबंध होता आता याच समीर काळेच्या भावाची हत्या करण्यात आली आहे.

फॉरेन्सिक टीम दाखल, तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ़ राजकुमार शिंदे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलीसांच्या सोबत फॉरेन्सिक टीमही दाखल झाली आहे. फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरील पुरावे जमा करत आहे. तसेच ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या जागेवर सामान्य लोकांना जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?