AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार

पुण्यात एका रिक्षा चालकावर भरदिवसा तिघांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार
Rickshaw Driver Assault Pune
| Updated on: May 19, 2026 | 5:55 PM
Share

पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघत आहेत. कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवर राजमाता भुयारी मार्गा जवळील दत्तनगर चौकात काल एका रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काल १८ मे २०२६ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडलेल्या सनसनाटी घटनेचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर करत सरकारला जाब विचारला आहे.

पुण्यात कोयता गँगचा उच्छात कायम असताना दिवसा ढवळ्या एका रिक्षा चालकावर जुन्या वादातून कोयत्याने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. काल सोमवारी सकाळी नवले ब्रिज या मार्गावरील राजमाता भुयारी मार्गावर ही घटना घडली आहे. या घटनेत सुरज माणिक काळे ( ३० रा. कात्रज, पुणे ) याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला झाला आहे. या प्रकरणात हा सुरज काळे याच्यावर लागोपाट वार झाल्यानंतर तो पुलावर खाली कोसळल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या प्रकरणात आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज काळे हा पेशाने रिक्षा चालक असून अन्य तिघा रिक्षा चालकांना त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला. या प्रकरणात या रिक्षा चालकात दोन ते तीन वर्षांपासून वाद सुरु होते. ही दुश्मनी रिक्षा प्रवासी बसवणे आणि रिक्षा स्टँडमधील वर्चस्वावरुन सुरु झाल्याचे समजते. त्यामुळे हळूहळू या दुश्मनीचे रुपांतर हिंसक हल्ल्यात झाले. घटनेदिवशी आरोपींनी सुरज काळे याला घेरले आणि त्याच्यावर हत्यारांनी केला. तो गंभीर जखमी होऊन पुलावर भुयारी मार्गाच्या समोर कोसळला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

येथे पाहा व्हिडीओ –

तिघा हल्लेखोरांना अटक

आंबेगाव पोलिसांनी या प्रकरणात तातडीने तिघा रिक्षा चालकांना अटक केली आहे. बाळासाहेब भोसले (वय ३५ वर्षे, रा. ता. वेल्हा, जिल्हा पुणे), गणेश हरिभाऊ धारपाले (वय २७ वर्षे, रा. ता. भोर, जिल्हा पुणे) आणि गणेश ऊर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे (वय ३६ वर्षे, रा. आंबेगाव पठार, पुणे) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी पुण्यातील वेगवेगळ्या भागात रहाणारे आहेत. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी पोस्ट करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर टीका केली आहे.

Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...