AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बस चालक साईट देईना म्हणून संतापला अन् नको ते करुन बसला, दुचाकी बससमोर आडवी घातली अन्…

महाराष्ट्र शासनाच्या बस चालकांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला आहे. अरुंद रस्ता असल्याने बस चालकाने रस्ता न दिल्याने सांगलीत धक्कादायक घटना घडली आहे.

बस चालक साईट देईना म्हणून संतापला अन् नको ते करुन बसला, दुचाकी बससमोर आडवी घातली अन्...
Image Credit source: TV9 Network
| Edited By: Kiran Balasaheb Tajne | Updated on: May 09, 2023 | 3:15 PM
Share

सांगली : बस चालकाने दुचाकी चालकाला साईट न दिल्यानं मारहाणीची घटना समोर आली आहे. एसटी बस चालकाच्या डोक्यात दगड घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्लामपूरच्या ताकारी रोडवर ही घटना घडली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली आहे. मारहाणीत एसटी चालक रामचंद्र मारुती पाटील हे गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये राजू इनामदार आणि त्याचा साथीदार असलेल्या व्यक्तीवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर बस चालकांच्या सुरक्षेचा आणि वागणुकीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. खरंतर रस्ता अरुंद असल्याने साईट न दिल्याची बाब सांगितली जात आहे. तर दुसरीकडे बस चालक मुद्दामहून साईट देत नसल्याचेही बोलले जात आहे.

इस्लामपुर पोलिस ठाण्यात चालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक रामचंद्र मारुती पाटील हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार केले जात आहे.

सोमवारी दुपारी चालक रामचंद्र पाटील आणि वाहक अजित कुंभार हे महाराष्ट्र राज्य शासनाची बस घेऊन इस्लामपुरातून कडेगाव कडे जात होते. त्याच दरम्यान जात असतांना दुचाकी वर ताकारी येथे राजू आणि त्याचा साथीदार यांनी अडवून जाब विचारण्यास सुरुवात केली.

खरंतर साईट का देत नव्हता म्हणून संशयित राजू आणि त्याचा साथीदार विचारणा करत असतांनाच बाचाबाची झाली. त्यामध्ये राजू याने चालकाच्या डोक्यात दगड उचलून मारला. त्यात चालक रामचंद्र पाटील हे खुर्चीवरच बेशुद्ध पडले होते.

रस्ता तुझ्या बापचा आहे का? म्हणत केलेल्या मारहाणीत चालक रामचंद्र पाटील गंभीर जखमी झाल्याने या घटनेची पंचक्रोशीत जोरदार चर्चा होऊ लागली आहे. खाजगी रुग्णालयात गंभीर जखमी झालेल्या चालकावर उपचार केले जात आहे. तर पोलिस संशयितांचा शोध घेत आहे.

Follow Us
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?
तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू...; प्रवीण दरेकरांचा सूचक इशारा
Pravin Darekar On Ramdas Kadam : तुम्ही आरे केलं तर, आम्ही पण कारे करू....; प्रवीण दरेकरांचा रामदास कदमांना सूचक इशारा
मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; AQI तब्बल....
Mumbai Air Pollution : मुंबईच्या हवेत विषारी धुरक्याची चादर; दादर चौपाटीवर दृश्यमानता घटली, AQI तब्बल....
जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल
Mangesh Sasane : मनोज जरांगेंना 500 कोटी देऊन कोणी उभं केलं? मंगेश ससाणेंचा खळबळजनक सवाल, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता?
Chandrakant Khaire : मनोज जरांगेंना तुम्हीच मोठं केलं ना, मग आता बाजूला का करता? चंद्रकांत खैरेंचा रोख नेमका कोणाकडे?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची