AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Crime : फूलप्रूफ प्लानिंग करून ते दरोडा टाकण्यासाठी आले, पण… पोलिसांनी कशा आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या ?

दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी सापळा रचत अटक केली. त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य तसेच रोख रक्कम व कारही जप्त करण्यात आली.

Sangli Crime : फूलप्रूफ प्लानिंग करून ते दरोडा टाकण्यासाठी आले, पण... पोलिसांनी कशा आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या ?
| Updated on: Sep 19, 2023 | 1:58 PM
Share

सांगली | 19 सप्टेंबर 2023 : फूलप्रूफ प्लानिंग आणि तयारी करून दरोडा टाकण्याच्या (robbery) उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सहाजणांची ( 6 arrested) ही टोळी रेकॉर्डवर असल्याचे समजते. पोलिसांनी त्या दरोडेखोरांकडून एक कार, रोकड, चार मोबाईल, लोखंडी कटावणी, कोयता, चाकू, पक्कड, नायलॉनची दोरी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड असे दरोड्याचे सामान ताब्यात घेतले. तसेच या चोरट्यांकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती विटा येथील पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भिवघाटकडे येणाऱ्या या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

जितेंद्र भानुदास काळे (वय ३०, रा. मार्डी, सोलापूर), शिवाजी रामा काळे (वय २६, रा. जत), दादाराव लक्ष्मण पवार (वय ४२, रा. राणमासळे, सोलापूर), सुखदेव शिवाजी काळे (वय ३२, रा. मार्डी, सोलापूर), किरण शिवाजी काळे (वय २९, रा. मार्डी, सोलापूर), बालाजी माणिक पवार (वय २६, रा. मार्डी, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी कसा रचला सापळा ?

दरोडेखोरांची एक टोळी भिवघाटमार्गे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने रात्री येत असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्याद्वारे मिळाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईसाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली. विटा-भिवघाट रस्त्यावर पोलिसांच्या या पथकांनी मध्यरात्री सापळा रचला. खबऱ्याने ज्या कारची माहिती दिली होती, तीच कार पोलिसांनी अडवली असता, त्यामध्ये सहा जण होते.

पोलिसांनी त्यांना बाहेर काढून कारची झडती घेतली असता दरोड्याचे सर्व सामान आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोबाईल, लोखंडी कटावणी, कोयता, चाकू, पक्कड, नायलॉनची दोरी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड तसेच रोख रक्कम आणि कारही जप्त केली. तसेच सहाही दरोडेखोरांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. त्यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात दरोडा,जबरी चोरी, चोरी असे तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातही गुन्हे केले आहेत का याचा तपास विटा पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल