AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! तामिळनाडूमधील शाळेत 15 मुलींचे लैंगिक शोषण, एका शिक्षकाला अटक

तामिळनाडूमधून (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम (Ramanathapuram) जिल्ह्यातील एका सरकारी शाळेमधील काही विद्यार्थीनींनी शिक्षकांवर लैंगिक शेषणाचा आरोप केला आहे.

धक्कादायक! तामिळनाडूमधील शाळेत 15 मुलींचे लैंगिक शोषण, एका शिक्षकाला अटक
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 1:56 PM
Share

चेन्नई : तामिळनाडूमधून  (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम (Ramanathapuram) जिल्ह्यातील एका सरकारी शाळेमधील काही विद्यार्थीनींनी शिक्षकांवर लैंगिक शेषणाचा (Sexual Harassment) आरोप केला आहे. विद्यार्थीनींच्या आरोपानंतर संबंधित एका शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरा शिक्षक फरार झाला आहे. या शिक्षकांवर तब्बल 15 मुलींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. शाळेमध्ये बाल कल्याण विभागाच्या वतीने बाल सुरक्षा अभियानांतर्गत उपक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान ही घटना समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित शिक्षक या शाळेमध्ये गणित आणि सामाजशास्त्र शिकवत होते. हे शिक्षक शाळा सुटल्यानंतर देखील मुलींना फोन करायचे, तसेच त्यांच्याशी द्विआर्थी शब्दातून बोलायचे. या मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचे, अशी तक्रार या मुलींनी केली आहे. हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यातील समाजशास्त्र शिकवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर गणित शिकवणार शिक्षक फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नव्या गाईडलाईन्स जारी

तामिळनाडूमधून अशा घटना वारंवार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका शाळेच्या कर्मचाऱ्याने ऑनलाईन क्लासदरम्यान मुलीसोबत गैरवर्तण केले होते. अशाप्रकणाला आळा घालण्यासाठी आता राज्य सरकार कठोर पाऊले उचलत असून, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

तब्बल 29 वर्षांनी मृत पीडितेला मिळाला न्याय; आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला सक्तमजुरी

सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या भावाला 10 वर्षे सक्त मजुरी, प्रकरण लपवणाऱ्या आईला 1 वर्ष कारावास!

Nagpur Crime | फाटलेले कपडे, विखुरलेले केस, काट्यागोट्यांमधून जाणे-येणे; ये देखो मेरी लाइफ…, गुंडाचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.