धक्कादायक! ठाणे पोलीस आयुक्तांचा मोबाईल हॅक, स्टेटसला नको ते व्हिडिओ.. पोलीस दलात खळबळ

धक्कादायक बाब म्हणजे मोबाईल हॅक करुन डुंबरे यांच्या वॉट्सअपवरुन अश्लील व्हिडिओ स्टेटसला ठेवण्यात आलेत. या गंभीर प्रकाराने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे 

धक्कादायक! ठाणे पोलीस आयुक्तांचा मोबाईल हॅक, स्टेटसला नको ते व्हिडिओ.. पोलीस दलात खळबळ
| Updated on: Nov 17, 2026 | 6:05 PM

Thane Police Commissioner News:  ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशितोष डुंबरे यांचा मोबाईल हॅक झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.  धक्कादायक बाब म्हणजे मोबाईल हॅक करुन डुंबरे यांच्या वॉट्सअपवरुन अश्लील व्हिडिओ स्टेटसला ठेवण्यात आलेत. या गंभीर प्रकाराने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त आशितोष डुंबरे यांचा मोबाईल फोन हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आशुतोष डुंबरे यांचा मोबाईल हॅक करुन त्यांच्या वॉट्सऍपवर अश्लील व्हिडिओंचे स्टेटस ठेवण्यात आले. या गंभीर प्रकाराने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान,  पोलीस आयुक्तांचा मोबाईल हॅक करणाऱ्याचा हॅकरचा ठाणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. दुसरीकडे थेट पोलीस आयुक्तांचाच मोबाईल हॅक झाल्याने आणि वॉट्सअपला अश्लील व्हिडिओ स्टेटस ठेवण्यात आल्याने वेगळीच कुजबूज सुरु झाली आहे. या प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाईल हॅक न होण्यासाठी या टीप्स लक्षात ठेवा!

  • मोबाईलला कठीण पासवर्ड ठेवा, किंव पॅटर्न लॉक लावा आणि तो कोणाशीही शेअर करू नका.
  • तुमचा फोनचा ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्स नेहमी अपडेट ठेवा, कारण नवीन अपडेट्समध्ये सुरक्षेतील त्रुटी दूर केल्या जातात.
  • ईमेल, एसएमएस किंवा सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही अज्ञात किंवा संशयास्पद लिंकवर किंवा APK फाईलवर क्लिक करू नका.
  • अँड्रॉइड फोनमध्ये Google Play Protect नेहमी चालू ठेवा, जे हानिकारक ॲप्स शोधण्यास मदत करते.
  • तुमच्या सर्व महत्त्वाच्या खात्यांवर (ईमेल, सोशल मीडिया, बँकिंग) टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्रिय करा.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us