AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीचं कोरोनाने निधन, वैधव्याचं दु:ख सोसणाऱ्या वहिणीवर बलात्कार, नणंद-दिराकडून प्रचंड मारहाण, पीडितेची न्यायासाठी हाक

देशात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. उत्तर प्रदेशात तर प्रचंड भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

पतीचं कोरोनाने निधन, वैधव्याचं दु:ख सोसणाऱ्या वहिणीवर बलात्कार, नणंद-दिराकडून प्रचंड मारहाण, पीडितेची न्यायासाठी हाक
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक छळ करणाऱ्या आरोपीला तेलंगणातून अटक
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 05, 2021 | 5:09 PM
Share

लखनऊ : देशात महिला अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. उत्तर प्रदेशात तर प्रचंड भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका विधवा वहिणीवर नराधम दिराने बलात्कार केला आहे. नराधम फक्त एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या बहिणींच्या मदतीने पीडितेला प्रचंड मारहाण केली. उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातून ही संताजनक घटना समोर आली आहे. विधवा महिला पोलिसात तक्रारीसाठी घराबाहेर पडली तेव्हा नराधम दिराने तिला आपल्या बहिणींसह रस्त्यावर लोळून, जमिनीवर खाली पाडून प्रचंड मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल होऊ लागले आहेत.

पीडितेच्या पतीचं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निधन

पीडित महिलेच्या पतीचं काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झालं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली होती. या दरम्यान मृत्यूचा आकडा देखील प्रचंड वाढला होता. त्याच भयावह काळात पीडितेच्या पतीचं 26 मे रोजी निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर पीडित महिला एकटी पडली. याच गोष्टीची फायदा घेऊन दिराने पीडितेवर बलात्कार केला.

पीडितेच्या मुलाला देखील मारहाण

दिराच्या किळसवाण्या आणि संतापजनक कृत्याविरोधात पीडिता पोलिसात तक्रार करण्यासाठी निघाली तेव्हा नराधम आरोपीने तिला निघृणपणे मारहाण केली. यावेळी त्याच्या बहिणींनी देखील पीडितेला मारहाण केली. पीडितेला आठ वर्षांचा मुलगा आहे. आरोपींनी त्या मुलालादेखील मारहाण केली.

सुरुवातीला पोलिसांकडून चांगला प्रतिसाद नाही

अखेर पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचली तेव्हा पोलिसांकडून तिला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी तिला प्रकरण निवाळण्याचा सल्ला दिला. पोलीस तक्रार लिहिण्याऐवजी तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

अखेर हे प्रकरण पोलीस आयुक्त संजीव त्यागी यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी तातडीने या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. मात्र, गुन्हा दाखल करण्याआधीच आरोपी दिर आणि त्या बहिणींनी पीडितेला प्रचंड मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात मारहाण आणि बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे दाखल केले.

हेही वाचा : 

भारतातील अपहरणाची ‘ती’ भयानक घटना ज्याने संपूर्ण देश हादरला होता

पतीने गळा पकडला, शिव्या देखील दिल्या! ‘बागबान’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

Follow Us
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?