पतीने गळा पकडला, शिव्या देखील दिल्या! ‘बागबान’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज

मनोरंजन विश्व जेवढे बाहेरून दिसायला चकाचक आहे, तितकेच त्याचे वास्तव काही वेगळेच दिसते. इथे जितक्या लवकर नातेसंबंध तयार होतात, तितक्याच लवकर तो तुटलेले दिसतात.

पतीने गळा पकडला, शिव्या देखील दिल्या! ‘बागबान’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरने दाखल केला घटस्फोटाचा अर्ज
आरजू गोवित्रीकर

मुंबई : मनोरंजन विश्व जेवढे बाहेरून दिसायला चकाचक आहे, तितकेच त्याचे वास्तव काही वेगळेच दिसते. इथे जितक्या लवकर नातेसंबंध तयार होतात, तितक्याच लवकर तो तुटलेले दिसतात. पूर्वी टीव्ही जगतातील अनेक कलाकारांची नाती तुटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. करण मेहरा-निशा रावल आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम प्रियंका उधवानीनेही तिच्या बॉयफ्रेंडसोबत वेगळे होण्याचा निर्णय घेतला. सध्या हनी सिंह देखी कौटुंबिक हिंसाचाराच्या आरोपात अडकलेला दिसत आहे. त्याच्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत.

दरम्यान, मनोरंजन विश्वातून अशीच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘बागबान’ आणि ‘नागिन 2’ फेम अभिनेत्री आरजू गोवित्रीकरनेही (Arzoo Govitrikar) तिच्या पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला आहे.

पती विरोधात दाखल केला गुन्हा!

आरजू अभिनेत्री आणि मॉडेल अदिती गोवित्रीकर यांची बहीण आहे. आरजूने तिचा पती सिद्धार्थ सभरवालपासून वेगळे होण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. यात तिने तिचा पती तिला शिवीगाळ करतो, मारहाण करतो, आता या सर्व गोष्टी असह्य झाल्या आहेत, असे म्हटले आहे. आरजू गोवित्रीकरने 2019 मध्ये पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

एका मुलाखतीदरम्यान, आरजू म्हणाली की, ‘आता मी गप्प बसू शकत नाही आणि मी हे सर्व सहन करू शकत नाही. आता मी घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. मी माझा स्वाभिमान रोखला, मी खूप प्रयत्न केले पण आता पाणी माझ्या डोक्यावरून गेले आहे. मी आता सिद्धार्थसोबत आणखी राहू शकत नाही. मी आतापर्यंत मीडियाशी बोललो नव्हते, पण आता मला सर्व काही सांगायचे आहे.’

आरजू पुढे म्हणाल्या की, ‘मला सांगायचे आहे की, त्याने माझा गळा पकडून मला घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. मला कानाखाली मारली, पोटात लाथ मारली आणि मला काय होतंय हे देखील कळलं नाही.’

मला जगजाहीर करायचे नव्हते!

आरजू पुढे म्हणाल्या, ‘मला बेदम मारहाण केली जायची आणि मी समोर येऊ शकले नाही कारण मला हे सर्व जगाला दाखवायचे नव्हते. आमच्या लग्नाच्या दोन वर्षानंतर सिद्धार्थने माझ्यावर पहिल्यांदा हात उचलला होता. लग्नाच्या तीन वर्षानंतर जेव्हा आम्हाला मुलगा झाला तेव्हा तो वेगळा झाला आणि दुसऱ्या खोलीत झोपू लागला. नंतर मला कळले की, त्याला एक रशियन मैत्रीण आहे. तो तिच्याशी सतत गप्पा मारायचा. मी त्याला याबद्दल विचारले देखील. मला माहित नाही की, ते आता एकत्र आहेत की नाही कारण तो माझ्यापासून वेगळा राहतो.’

आरजूने असेही सांगितले की, तिच्याकडे पतीची चॅटिंग आणि तिला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आहे, जे तिला न्याय मिळवून देण्यात मदत करेल.

(Baghban Fame Actress Arzoo Govitrikar files Divorce case against her husband)

हेही वाचा :

शाहरुख आमिरला म्हणाला काजोल चांगली अभिनेत्री नाही! आता म्हणतोय सुहानाने तिच्याकडूनच अभिनयाचे धडे घ्यावेत!  

आ देखे जरा किसमे कितना है दम… अनुष्काची ही अमिताभ स्टाईल पाहिली का?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI