Video : लग्नात सर्वांसमोर BF राजला मिठी मारून ढसाढसा रडली सोनम, राजा रघुवंशी प्रकरणातील तो व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनम बॉयफ्रेंडला मिठी मारुन ठसाठसा रडताना दिसत आहे.

Video : लग्नात सर्वांसमोर BF राजला मिठी मारून ढसाढसा रडली सोनम, राजा रघुवंशी प्रकरणातील तो व्हिडीओ व्हायरल
Raja Raghuvanshi
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 19, 2025 | 1:15 PM

इंदोर येथील राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात दररोज वेगवेगळी माहिती पोलिसांच्या हाती लागताना दिसत आहे. प्रियकरासाठी 5 मित्रांनासोबत घेऊन पत्नी सोनमने राजाची हत्या केली. शिलाँग पोलिसांनी या प्रकरणाला ‘ऑपरेशन हनीमून’ असे नाव देत चौकशी सुरु केली आहे. इंदोर क्राइम ब्रांचचे पथकही त्यांच्यासोबत या प्रकरणाचा तापास करत आहेत. दरम्यान, सोनचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

काय आहे व्हिडीओ?

याच वर्षी 11 मे रोजी सोनम आणि राजाचं लग्न झालं होतं. त्यांचे लग्न मोठ्या थटामाटात पार पडले होते. अनेकांनी या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नानंतर बिदाई करताना सोनमने आई आणि वडिलांची गळा भेट घेतली होती. त्यानंतर तिने कथित बॉयफ्रेंड राजला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली. लग्नानंतर दोघेही मेघालयातील शिलॉंग येथे हनीमूनसाठी गेले होते. राज आणि सोनमचा मिठी मारुन रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

वाचा: राजा टॉयलेट गेला अन् मागून सोनमने… हत्येच्या क्षणी नेमकं काय घडलं? ‘ऑपरेशन हनीमून’मध्ये अखेर रहस्य उलघडलं

कहाणी कुठून सुरू झाली?

मध्य प्रदेशातील इंदौरचा रहिवासी राजा रघुवंशी आपल्या पत्नीसोबत मेघालयच्या सोहरा येथे हनीमूनसाठी गेला होता. याच ट्रिपवर त्याची हत्या करण्यात आली. हत्येचा गुंता अनेक दिवस अनुत्तरित राहिला. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन द्यावे लागले. त्यानंतर मेघालय पोलिसांनी प्रकरण सोडवण्यासाठी जीव तोड मेहनत घेतली. हत्येनंतर १७ दिवसांनी पोलिसांना हत्याऱ्यांचा शोध लागला.

धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येचा कट कोणी दुसऱ्याने नव्हे तर राजाची पत्नी सोनमने रचला होता. या कटात चार जणांनी तिची साथ दिली होती. पोलिसांनी सर्व ५ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींची चौकशी केली. या हत्याकांडात राजाची पत्नी सोनम, तिचा कथित प्रियकर राज सिंह कुशवाह आणि त्याचे मित्र आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी यांचा समावेश होता.

काय आहे व्हिडीओ?

पतीच्या हत्येचा प्लान आखणारी सोनम सध्या तुरुंगात कैद असून तिला 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम तुरुंगात खूप अस्वस्थ असते. सीसीटीव्हीद्वारे पोलिसांचं तिच्यावर 24 तास लक्ष असतं.