स्वीमिंग कोचची आत्महत्या, क्रीडा मंडळाच्या बाथरुममध्ये गळफास

| Updated on: Dec 25, 2020 | 11:18 AM

स्वीमिंग कोच अक्षय कांबळे यांच्या आत्महत्येने बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे. Akshay Kamble suicide in Beed

स्वीमिंग कोचची आत्महत्या, क्रीडा मंडळाच्या बाथरुममध्ये गळफास
स्वीमिंग कोच अक्षय कांबळे यांच्या आत्महत्येने बीड शहरात एकच खळबळ
Follow us on

बीड: शहरातील चंपावती क्रीडा मंडळ येथे स्विमिंग कोच असलेल्या अक्षय कांबळे यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अक्षय कांबळे यांच्या आत्महत्येने बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे. चंपावती क्रीडा मंडळातील बाथरूममध्ये अक्षय यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.अक्षय यांनी आत्महत्या का केली हे अद्याप अस्पष्ट असून शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. (Swimming coach Akshay Kamble suicide in Beed at sports club bathroom)

अक्षय कांबळे याचे वय 22 वर्षे होते. लहाणपणी वडिलांचे छत्र हरपल्यानं तो मामांकडे राहात होता. मामांनी अक्षयचा सांभाळ केला होता. गेल्या चार वर्षांपासून चंपावती क्रीडा मंडळात तो स्विमिंग कोच म्हणून कार्यरत होता. अक्षयचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांकडून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून अक्षयच्या मोबाईलची तपासणी

शिवाजीनगर पोलीसांनी अक्षय कांबळेच्या आत्महत्येप्रकरणी तपास सुरु केला आहे. अक्षयचा मोबाईलची तपासणी केली असता रात्रीच्या सुमारास त्याने एका महिलेला व्हिडीओ कॉल केल्याचे उघड झाले आहे. व्हिडीओ कॉल वर अक्षय आणि त्या महिलेचे काय संभाषण झाले असावे, याची माहिती पोलीस घेत आहेत. अक्षय आणि त्या महिलेचे काय संबंध होते, अक्षयला सदर महिला ब्लॅकमेल करत होती का याचाही तपास पोलीस करत आहेत.

संबंधित महिलेच्या अटकेची नातेवाईकांची मागणी

अक्षय कांबळे हा आत्महत्या करणारा मुलगा नव्हता. अक्षयला आत्महत्या करण्यास परावृत्त केल्याचा आरोप नातेवाईक संतोष तात्या थोरात यांनी केला आहे. संबंधित व्हिडीओ कॉलची शहानिशा करुन त्या महिलेस जेरबंद करावी, अशी मागणी नातेवाईक करत आहेत. या प्रकरणी पोलिसांना आज पुरवणी तक्रार देणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अक्षय कांबळे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

सहा वर्षीय चिमुकल्याच्या हत्येचं गूढ काही तासात उकललं, बोरांच्या वाटणीवरुन मित्रानेच संपवलं

चोरीच्या तपासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा; मुंबई पोलिसांची कामगिरी

(Swimming coach Akshay Kamble suicide in Beed at sports club bathroom)