AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरीच्या तपासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा; मुंबई पोलिसांची कामगिरी

चोरीचा तपास करत असतानाच सहा महिन्यानंतर एका खुनाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. (Six months after man reported missing, two arrested for his murder)

चोरीच्या तपासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा; मुंबई पोलिसांची कामगिरी
| Updated on: Dec 24, 2020 | 7:38 PM
Share

मुंबई: चोरीचा तपास करत असतानाच सहा महिन्यानंतर एका खुनाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली असून कसून चौकशी सुरू आहे. (Six months after man reported missing, two arrested for his murder)

मुंबईच्या आरे कॉलनीत राहणाऱ्या 23 वर्षीय रवी साबळेचा प्रेमप्रकरणातून हत्या झाली होती. मात्र, त्याचा मृतदेह न सापडल्याने तो हरवल्याची जूनमध्ये पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. याच दरम्यान आरे कॉलनीत एक चोरी झाली. या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. या दोन आरोपींची कसून चौकशी करत असतानाच ते हरवलेल्या रवीला ओळखत असल्याचं आढळून आलं. त्यामुळे पोलिसांनी त्यांची आणखी कसून चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या मुबारक सय्यद ऊर्फ बाबूने त्यानेच रवीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलीसही काळ चक्रावून गेले होते.

काय आहे प्रकरण?

मयत रवी साबळे एका तरुणीवर प्रेम करत होता. याच दरम्यान तिचं मुबारक सय्यदशीही प्रेमप्रकरण सुरू झालं. ही कुणकुण रवीला लागल्याने रवीचे तिच्या प्रेयसीबरोबर खटके उडाले. या दरम्यान, मुबारकने रवीला जंगलात बोलावले आणि तिथे त्याची दगडाने ठेचून हत्या केली. अमित शर्मा या आरोपीच्या साथीने मुबारकने ही हत्या केली. रवी आपल्या प्रेयसीला वारंवार भेटत होता. त्या रागातून त्याची हत्या केल्याची कबुली मुबारकने दिली. दरम्यान, रवीचा मृतदेह अजून सापडलेला नाही. मुबारक आणि अमित शर्माला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे, असं डीसीपी डॉ. डी. स्वामी यांनी सांगितलं. (Six months after man reported missing, two arrested for his murder)

संबंधित बातम्या:

लस येण्यापूर्वीच चिनी हॅकर्सचा डोळा; बनावट लसीची भीती, मुंबई पोलीस सतर्क

पालघर साधू हत्याकांडप्रकरणी पुन्हा 24 जणांना अटक; 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी

कल्याणमध्ये मुळशी पॅटर्न? जेलमधून सुटलेल्या आरोपीचे फटाके फोडत स्वागत, जल्लोषात फरार आरोपीही सहभागी

(Six months after man reported missing, two arrested for his murder)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.