पैशांसाठी सहकार्याची हत्या, मध्यरात्री स्कुटरवर मृतदेह ठेवून फिरस्ती, प्रकार सीसीटीव्हीत कैद

सहकार्याच्या हत्येनंतर आरोपी मृतदेहाला ठिकाण्यावर लावण्यासाठी स्कुटरवर जागा शोधत होता (New Delhi Crime).

पैशांसाठी सहकार्याची हत्या, मध्यरात्री स्कुटरवर मृतदेह ठेवून फिरस्ती, प्रकार सीसीटीव्हीत कैद
| Updated on: Dec 30, 2020 | 4:32 PM

नवी दिल्ली : दिल्लीच्या रोहिणी परिसरातील प्रेम नगर येथे एका व्यक्तीने पैशांसाठी आपल्याच सहकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (New Delhi Crime). सहकार्याच्या हत्येनंतर आरोपी मृतदेहाला ठिकाण्यावर लावण्यासाठी स्कुटरवर जागा शोधत होता. यावेळी स्कुटरवर त्याने मृतदेहाला सोबत घेतलं होतं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

आरोपीचं नाव अंकित असं आहे. पैशांच्या व्यवहारावरुन त्याने त्याचा सहकारी रवीचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने स्कुटरवर रवीचा मृतदेह घेऊन फिरत होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला (New Delhi Crime).

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकितने सोमवारी (28 डिसेंबर) रात्री रवीला आपल्या घरी बोलावलं. रवी घरी गेल्यावर दोघांमध्ये पैशांवरुन प्रचंड मोठं भांडण झालं. या भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी अंकितने रवीचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर एका पांढऱ्या गोणीत मृतदेह टाकला. अंकितने मृतदेह स्कुटरवर ठेवला आणि एका नाल्यात फेकून दिला. सकाळी रस्त्याने जाणाऱ्या लोकांना मृतदेह दिसला. त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. अंकितचे म्हणणे आहे की, रवीने त्याच्याकडून 77 हजार रुपये घेतले होते. पण तो परत देत नव्हता.

पोलिसांनी तपास कसा केला?

पोलिसांनी सुरुवातीला संबंधित परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. यापैकी काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंकित मृतदेहाला स्कुटमधून घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर पोलिसांनी अंकितला सीसीटीव्हीच्या आधारे जेरबंद केलं.

हेही वाचा : अडीच वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या, जामिनावर सुटलेल्या आरोपीचं दुष्कृत्य