पोलीस दाम्पत्याचं घरगुती भांडण विकोपाला गेलं, महिलेने जीवनच संपवलं; गडचिरोलीतील मन सुन्न करणारी घटना

| Updated on: Feb 01, 2022 | 2:38 PM

नव-यासोबत होणा-या सततच्या वादाला ती कंठाळली असल्याने तिने असं पाऊल उचललं असल्याचं पोलिस निरीक्षक अरविंद कुमार (arvind kumar) यांनी सांगितलं.

पोलीस दाम्पत्याचं घरगुती भांडण विकोपाला गेलं, महिलेने जीवनच संपवलं; गडचिरोलीतील मन सुन्न करणारी घटना
पोलिस शिपाई, प्रणाली काटकर
Follow us on

गडचिरोली – गडचिरोली पोलीस मुख्यालयात (gadchiroli police headquarters) शिपाई असणा-या महिलेने सततच्या घरच्या वादाला कंठाळून विषप्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पोलिस (police) महिलेचा पती सुध्दा पोलिस दलात शिपाई पदावर कार्यरत आहे. तसेच तिच्या पतीचं तिच्यासोबत दुसरा विवाह झाला आहे. आत्महत्या केलेल्या पोलिस महिलेचं नाव प्रणाली काटकर (pranali katkar) (35) असं आहे. नव-यासोबत होणा-या सततच्या वादाला ती कंठाळली असल्याने तिने असं पाऊल उचललं असल्याचं पोलिस निरीक्षक अरविंद कुमार (arvind kumar) यांनी सांगितलं. तसेच दोघेही पोलिस मुख्यालयाच्या पोलिस कॉलनीत राहत होते. काल रात्री उशीरा दोघांच्यात जोरात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने प्रणाली काटकर यांनी विष प्राशन केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

कारणामुळे विषप्राशन केले

प्रणाली काटकर (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. काटकर या पोलिस दलात मागच्या आठ वर्षापुर्वी भरती झाल्या होत्या. भरती झाल्यापासून आत्तापर्यंतची पोलिस सेवा चांगली राहिली आहे. प्रणाली काटकर यांनी दोन वर्षापुर्वी पोलिस दलातील शिपाई संदीप पराते यांच्यासोबत विवाह केला. परंतु संदीपचा हा दुसरा विवाह असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. तसेच दोघेही पोलिस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या पोलिस वसाहतीमधील एका इमारतीत राहत होते. त्यांच्यात सतत वाद होत असल्याचे शेजा-यांनी सुध्दा सांगितले आहे. काल रात्री दोघांच्यात जोराचा वाद झाला त्यानंतर वादाने टोकाची भूमिका घेतल्याने प्रणाली काटकर यांनी विषप्राशन केले. त्यानंतर पतीने तात्काळ रूग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले.

पतीचं दुसरं लग्न

पोलिस शिपाई संदीप पराते यांनी दुसरं लग्न का केलं ? किंवा पहिली पत्नी काय करते याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. दोन वर्षापूर्वी त्यांनी प्रणाली काटकर सोबत दुसरं लग्न केलं होतं. दोन वर्षाच्या संसारात सतत वाद होत होता. तसेच दोघेही पोलिस असल्याने शेजारच्या पोलिस वसाहतीत राहत होते. घरगुती वादाला कंठाळल्याने टोकाचं पाऊलं उचललं असावं अशी पोलिसांना शंका आहे. पोलिस याप्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.

VIDEO | डिव्हायडरचा अंदाज चुकल्याने भीषण अपघात, पाच प्रवाशांसह कार पुलावरुन थेट खाली

Pune Crime| दौंड गँगरेप प्रकरण ; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी, घटनेनंतर अवघ्या काही तासात केली होती अटक

दोन्ही कुटुंबांच्या संमतीने विवाह ठरला, नवरदेवाला चैन पडेना, लग्नाआधीच तरुणीवर बलात्कार