AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुचर्चीत पालममधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; फाटलेल्या नोटा आणि पेटीएममुळे आरोपीला अटक

दिल्लीच्या पालम परिसरामध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या वादातूनत भाच्यानेच आपल्या आत्याची आणि तिच्या मुलाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

बहुचर्चीत पालममधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; फाटलेल्या नोटा आणि पेटीएममुळे आरोपीला अटक
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 9:54 AM
Share

नवी दिल्ली :  दिल्लीच्या पालम परिसरामध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. अवघ्या पन्नास हजार रुपयांच्या वादातूनत भाच्यानेच आपल्या आत्याची आणि तिच्या मुलाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. भारतीय वायूसेनामध्ये अकाऊंटन असलेल्या श्रीकृष्ण स्वरूप यांच्या पत्नी आणि मुलाची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अभिषेक वर्मा या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाने चौकशीदरम्यान पोलिसांना हत्येची कबूली दिली.

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या पालम परिसरामध्ये  श्रीकृष्ण स्वरूप यांच्या पत्नी बबीता आणि मुलगा गौरव यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. संध्याकाळी जेव्हा श्रीकृष्ण स्वरूप हे कामावरून परतले तेव्हा पत्नी आणि मुलाचा मृतदेह पाहून त्यांना धक्काच बसला. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपीने एकही पुरावा मागे न ठेवल्याने आरोपीचा शोध घेणे  पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते.

असा झाला घटनेचा उलगडा

आरोपीने घरात लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील गायब केला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर अखेर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शेजारच्या घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक तरुण स्वरूप यांच्या घरातून बाहेर पडताना दिसत होता. त्याच्या तोंडाला रुमाल गुंडाळलेला होता. त्याच्या हातात काही तरी वस्तू दिसत होती. ही वस्तू म्हणजेच सीसीटीव्हीचे डीव्हीआर असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यानंतर पोलिसांनी परीसरातील रिक्षावाल्यांकडे चौकशी केली. तर त्यातील एका रिक्षा चालकाने आपण कपड्यावर रक्ताचे डाग असलेल्या एका तरुणाला रिक्षातून सोडल्याची माहिती पोलिसांना दिली. परंतु  त्याबाबत अधिक माहिती तो देऊ शकला नाही.

आरोपीने दिली हत्येची कबुली

पोलिसांनी रिक्षावाल्याकडे चौकशी केली असता, पोलिसांना आणखी एका गोष्टीची माहिती मिळाली ती म्हणजे या तरुणाकडे दहा रुपयांची फाटकी नोट होती. ही नोट घेण्यास रिक्षावाल्याने नकार दिला. तेव्हा या तरुणाने रिक्षावाल्याला पेटीएममधून पेमेंट केले. पोलिसांनी याच पेटीएम पेमेंटच्या आधारे संबंधित तरुणाचा शोध घेतला व त्याला अटक केली. चौकशीमध्ये त्याने आपण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी हा श्रीकृष्ण स्वरूप यांच्या पत्नी बबीता यांच्या भावाचा मुलगा होता. त्याने आत्याकडून पन्नास हजार रुपये उसने घेतले होते. पैसे मागितल्याने राग अनावर झाला आणि याचा रागातून हे दुहेरी हत्याकांड घडले,अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली.

संबंधित बातम्या 

मोफत जेवण दिलं नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण; अखेर ‘तो’ पोलीस अधिकारी निलंबित

NMC Scam | स्टेशनरी घोटाळा : साकोरे कुटुंबीयांना 40 वर्षांपासून कंत्राट; पाच नव्हे सात कंपन्या!

नाशिक हादरले! किरकोळ वादातून तरुणाची हत्या; आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष