AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; जबाबदारी स्वीकारणारा अनिल पंडित नेमका कोण ? पोलिसांनी उचलले हे पाऊल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टद्वारे अनिल पंडित याने टायगर श्रॉफ याच्यावरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. हे अकाऊंट नंतर डिलिट करण्यात आले होते.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; जबाबदारी स्वीकारणारा अनिल पंडित नेमका कोण ? पोलिसांनी उचलले हे पाऊल
Anil pandit
| Updated on: Oct 22, 2026 | 5:37 PM
Share

अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहू परिसरात रविवार, १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात आतापर्यंत एकूण १० आरोपींना विविध राज्यातून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणात गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा आरोपी अनिल पंडित नेमका कोण आहे ? त्याचा या प्रकरणातील सहभाग शोधला जात असून आता पोलिसांनी त्याच्या विरोधात मोठे पाऊल उचलले आहे. या प्रकरणात कोटावरुन अटक करण्यात आलेल्या तिघा शुटरना कोर्टात हजर करुन पोलिसांनी नऊ दिवसांच्या कोठडीची मागणी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात पुढील तपास केला जात आहे.

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर हल्ला केल्यानंतर या प्रकरणात सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारणारा आरोपी अनिल पंडित याच्याकडे पोलिसांनी आता मोर्चा वळवला आहे. अनिल पंडित हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे. अनिल पंडित हा ओव्हरसिज गुन्हेगारी कारवायांना तडीस नेत असतो. तो अमेरिकेतून ही टोळी चालवत असल्याचे म्हटले जात आहे.

टायगरवरील या हल्ल्याची जबाबदारी सर्वप्रथम स्वीकारली होती. त्याने म्हटले होते की आज जे टायगर श्रॉफचे काम झाले. त्याची जबाबदारी आपण आणि हरमन संधू घेत आहोत.याला आम्ही कॉल करुन समजावले होते. पण याला समजले नाही. जो कोणी फिल्म इंडस्ट्रीज आमचे ऐकणार नाही. सलमान खान याच्यासोबत काम करेल त्याचा पुढचा नंबर असेल. वाट पाहा…अशा आशयाची पोस्ट अनिल पंडित याने केली होती.

अलिकडे झालेल्या अशा प्रकारच्या हल्ल्याच्या घटनांची जबाबदारीचे दावे गेल्या सात महिन्यांत ‘पंडित’ नावाच्या व्यक्तीशी जोडले गेले आहेत. यामध्ये हरियाणातील पानिपत येथे एका मनी-एक्सचेंज कार्यालयात मार्च महिन्यात झालेला गोळीबार, दिल्लीत पंजाबी गायक गुरू रंधावा यांच्याशी संबंधित जिमबाहेर जून महिन्यात झालेला गोळीबार आणि सप्टेंबर महिन्यात हरियाणवी गायक दिलेर खर्किया यांच्या वाहनावर झालेला हल्ला यांचा समावेश आहे.

वॉन्टेड आरोपी घोषीत

लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असलेल्या अनिल पंडित याला टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात वॉन्टेड आरोपी घोषित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टद्वारे अनिल पंडित याने  या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. या प्रकरणात राजस्थानात कोटा येथे अटक केलेल्या तीन आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करून पोलिसांनी ९ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. गोळीबाराचा कट कोणी रचला, त्यामागील उद्देश काय होता आणि शस्त्रे कुठून मिळवली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

या प्रकरणात वापरलेले मोबाईल जप्त करणे, शस्त्रे हस्तगत करणे आणि फरार आरोपींची भूमिका तपासणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. गोळीबारासाठी आर्थिक मदत कोणी केली आणि संघटित गुन्हेगारी टोळीचा सहभाग होता का, याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे. या आरोपींचे बिहार, हरियाणा आणि इतर राज्यांतील कनेक्शन तपासण्यासाठी पोलिस विविध राज्यांत जाणार आहेत.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ