Rajasthan : ट्रकची वऱ्हाडाच्या गाडीला धडक, 8 जणांचा जागीचं मृत्यू

अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक काधी येथील ढाणीला जात होते. लग्न सोहळ्यापासून आठ किलोमीटरवरती हा अपघात झाला आहे. गाडीत अडकलेल्या अन्य लोकांना अन्य वऱ्हाडातील लोकांनी बाहेर काढले.

Rajasthan : ट्रकची वऱ्हाडाच्या गाडीला धडक,  8 जणांचा जागीचं मृत्यू
ट्रकची वऱ्हाडाच्या गाडीला धडक
Image Credit source: twitter
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 07, 2022 | 12:06 PM

नवी दिल्ली – राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेरमध्ये (Badmer) सोमवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. लग्न सोहळ्याला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीला अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात बाडमेर जिल्ह्यातील गुडामलानी पोलिस (police) स्टेशन अंतर्गत बाटा फाटेजवळ झाला. कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला त्यामध्ये 8 जणांनी आपला जीव गमवला आहे. अपघात इतका भयानक होता की, कारचा जागीचं चक्काचूर झाला आहे. त्यामुळे गाडीतील मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना अधिक अडचण निर्माण झाली होती. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

8 जणांचा जागीचं मृत्यू

या अपघातात पूनमाराम (45) मुलगा धीमाराम, प्रकाश (28) मुलगा पेमाराम, मनीष (12) मुलगा पूनमाराम, प्रिन्स (5) मुलगा मांगीलाल, भगीरथराम (38) मुलगा पोकराम आणि पूनमाराम (48) या वऱ्हाडी लोकांचा जागीचं मृत्यू झाला. तर मांगीलाल (35) मुलगा नैनाराम आणि बुधराम (40) मुलगा कनाराम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रकाश (२०) मुलगा हरजीराम विश्नोई हा गंभीर जखमी असून त्याच्यावर सांचोर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत झालेले अनेक सदस्य एकाच कुटुंबातील सदस्य आहेत.

हे सुद्धा वाचा

रात्री अंधारात हा अपघात झाला आहे

अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोक काधी येथील ढाणीला जात होते. लग्न सोहळ्यापासून आठ किलोमीटरवरती हा अपघात झाला आहे. गाडीत अडकलेल्या अन्य लोकांना अन्य वऱ्हाडातील लोकांनी बाहेर काढले. अपघात इतका भयानक होता, की अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना नागरिकांना भयानक त्रास झाला. रात्री अंधारात हा अपघात झाला आहे. अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें