Maharashtra News Live Update : महाविकास आघाडीची बैठक संपली, चारही जागा निवडून आणायच्याच आहेत, बैठकीत निर्धार

| Updated on: Jun 07, 2022 | 10:05 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : महाविकास आघाडीची बैठक संपली, चारही जागा निवडून आणायच्याच आहेत, बैठकीत निर्धार
राज्यसभा निवडणुकीआधी मुंबईत हायव्होल्टेज घडामोडीImage Credit source: tv9

मुंबई : आज मंगळवार 7 जून 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. राज्यसभेची निवडणुक जाहीर झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस वाढली आहे. आपल्या पारड्यात अधिक मतदान कसं होईल यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यापैकी अपक्ष आमदारांचं महत्त्व अधिक वाढलं आहे. छोट्या पक्षाचे आमदार आणि अपक्ष आमदार ज्यांना मतदान करतील तो उमेदवार निवडला जाईल. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांची काळजी घेतली आहे. राजकारणात ऐन टायमाला फुटू नये यासाठी काळजी घेतली आहे. आज महाविकास आघाडीच्या सगळ्या आमदारांची मुंबईत एका हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे मार्गदर्शन करणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Jun 2022 09:24 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत Live

    महाविकास आघाडीतील सर्व आमदार आणि अपक्ष आमदार सर्वजण आले होते

    सर्वांमध्ये प्रचंड आत्मविश्वास होता, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे उत्सवाची तयारी करा

  • 07 Jun 2022 09:18 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Live

    महाविकास आघाडीचे चारही खासदार दिल्लीत जाणार

    संबोधन सांगण्यासारखं नाही, मात्र विरोधकांनी कितीही प्रयत्न करूद्या काही फायदा होणार नाही

    आता आपल्याला राज्यसभेची निवडणूक आठवावी लागते

    आपण एक परंपरा पाळत आलो आहोत

    सभ्यता आणि राजकारण या गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी थोडीफार सभ्यता पाळायला हरतक नव्हती

  • 07 Jun 2022 09:14 PM (IST)

    काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण Live

    आमच्याकडे चांगलं सख्याबल आहे

    संख्याबळ नसताना भाजपने उमेदवार उभे केले

    घोडेबाजार करण्याचा भाजपचा उद्देश स्पष्ट आहे

  • 07 Jun 2022 09:13 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत Live

    विरोधी पक्षाने ही निवडणूक लादली आहे

    दहा ताखेला विजयी उत्सव साजरा करायचा आहे

  • 07 Jun 2022 09:12 PM (IST)

    महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आमदार Live

    महाविकास आघाडीचा आकडा जास्त आहे

    निवडणूक झाल्यानंतर आपल्याला पार्टी करायची आहे

    विजय आपलाच आहे

  • 07 Jun 2022 09:10 PM (IST)

    महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली

  • 07 Jun 2022 09:08 PM (IST)

    बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे लाईव्ह

    सर्वांना त्यांनी एकीचे आव्हान केलं आहे

    मला वाटतं आमदार त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील

    समान किमान कार्यक्रमावर आणखी भर दिला जाईल

    चारही जागा आपल्याच निवडून येतील एकत्रित बसून प्रश्न सोडवता येतील

  • 07 Jun 2022 08:31 PM (IST)

    Mahavikas Aghadi Meeting Live Update : महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू

    11 अपक्ष आमदारांचा महाविकास आघाडीला पाठिंबा

    मुंबईत महाविकास आघाडीची हायव्होल्टेज बैठक

  • 07 Jun 2022 08:18 PM (IST)

    Mahavikas Aghadi Meeting Live Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत पोहोचले

    तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते स्टेजवर दाखल

    राज्यसभा निवडणुकीआधी आघाडीचं शक्तिप्रदर्शन

    काही वेळात मार्गदर्शनाला सुरूवात होणार

    11 अपक्ष आमदार महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित

  • 07 Jun 2022 08:11 PM (IST)

    Mahavikas Aghadi Meeting Live Update : ट्रायडंटमधील बैठकील सर्व नेते पोहोचले

  • 07 Jun 2022 07:36 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्रायडंटमध्ये दाखल

    शरद पवार, खरगे आधीच उपस्थिती

    काही मिनिटात बैठक सुरू होणार

  • 07 Jun 2022 07:35 PM (IST)

    अपक्ष आमदार देवेंद्र भुयार बैठकीला उपस्थित

    अपक्ष आमदार किशोर जोरगेवार बैठकीला उपस्थित

    घोडेबाजार या शब्दाला जोरगेवार यांचा आक्षेप

  • 07 Jun 2022 07:32 PM (IST)

    हितेंद्र ठाकूर यांना बैठकीचं निमंत्रण नाही

    बहुजन विकास आघाडी बैठकीला उपस्थित नसणार

    महाविकास आघाडीकडून हे कसले संकेत?

    हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे तीन आमदार

    राज्यसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्वाचे

    बैठकीसाठी महाविकास आघाडीतील कुणाचाही फोन नाही

  • 07 Jun 2022 07:24 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ट्रायडंटकडे रवाना

    शरद पवार ट्रायडंटमध्ये पोहोचले

    महाविकास आघाडीच्या आमदारांची मोठी बैठक

    आमदार, मंत्री, खासदार बैठकीला उपस्थित

    राज्यसभा निवडणुकीसाठी एकी दाखवण्याचा प्रयत्न

    बैठकीपूर्वी आमदारांची नावनोंदणी

  • 07 Jun 2022 07:22 PM (IST)

    मुंबईत महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन

    शरद पवार आणि मल्लीकार्जून खर्गे एकाच वेळी पोहोचणार

    उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जून खर्गे करणार आमदारांना मार्गदर्शन

    राज्यसभा निवडणुकीसाठी हल्लचाली वाढल्या

  • 07 Jun 2022 07:08 PM (IST)

    संजय राऊत हॉटेल ट्रायडंटमध्ये दाखल, शरद पवारही हॉटेलकडे निघाले

    महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर हे महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन मानलं जात आहे. या बैठकीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत हॉटेल ट्रायडंटमध्ये दाखल झाले आहेत. तर शरद पवार निवासस्थानावरुन हॉटेलकडे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते हॉटेलवर पोहोचतील.

  • 07 Jun 2022 06:31 PM (IST)

    महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शनाचे Live Update

  • 07 Jun 2022 06:21 PM (IST)

    हॉटेल ट्रायडंटमध्ये आज महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन

    शरद पवार थोड्या वेळात निघतील

    शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड निघाले

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार राहणार उपस्थित

  • 07 Jun 2022 06:15 PM (IST)

    मुंबईत महाविकास आघाडीचं जोरदार शक्तिप्रदर्शन

  • 07 Jun 2022 05:23 PM (IST)

    वरून सरदेसाई युवासेना सचिव

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभ स्थळाची वरून सारदेसाई यांनी केली पाहणी

    तर उद्याची औरंगाबाद येथे होणारी सभा ररेकॉड ब्रेक होईल

    औरंगाबाद आणि शिवसेना हे जून नात असून लोकांचं प्रेम आहे

    कोणी सभा घेतली म्हणून ही सभा नाही

    या सभेकडे महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष

    ज्यांना कोणाला काय बोलाच बोलूद्या उद्या सडेतोड उत्तर मिळेल

  • 07 Jun 2022 04:41 PM (IST)

    औरंगाबाद-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा

    स्टेजच्या एका बाजूला ठेवण्यात आला संभाजी महाराजांचा पुतळा

    नामांतराचा मुद्दा गाजत असल्याने संभाजी महाराजांचा पुतळा ठेवण्यात आल्याची चर्चा

    तर सभास्थळी जोरदार तयारी सुरू

  • 07 Jun 2022 04:13 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत Live

    विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा अधिकृतपणे होईल

    ही घोषणा मुख्यमंत्रीही करू शकतात

    देवेंद्र फडणवीस लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो

    विधान परिषदेत विरोधकांवर तणाव येऊ शकतो

    काँग्रेसचे उमेदवार पहिल्या फेरीत निवडून येतील

  • 07 Jun 2022 04:08 PM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत Live

    आम्ही घाबरलेलो नाही

    मार्गदर्शनासाठी ही बैठक आहे

    या निवडणुका फार तांत्रिक असतात

    लहान पक्षांच्या काही मागण्या असतात

    अनेकदा त्या मागण्या मान्य होत नाही

    ही कामं मार्गी लावण्याची संधी असते

    ते काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही

    हे सर्व पक्ष आजही आमच्या बरोबरच

    आघाडीच्या स्थापनेनंतर ही एकमेकांची शक्ती दाखवण्याची पहिली संधी

    ही निवडणूक आता पूर्ण दाखवण्याची संधी

    हे आम्ही अत्यंत सकारात्मक पद्धतीने घेतलंट

    आम्हाला पाठिंबा देणाऱ्या लोकांशी आमचा संवाद सुरू

    आमच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही, आम्ही रिलॅक्स आहोत

    निवडणुकीत सर्व पत्ते उघडायचे नसतात

    दहा जूनला मतमोजणी झाली असेल तेव्हा सेनेचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत जिंकतील

    आघाडीच्या चारही जागा जिंकून येतील

    आम्हाला फोडाफोडी करण्याची अजिबात गरज नाही

  • 07 Jun 2022 03:42 PM (IST)

    रेल्वेच्या NTPC परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बाहेरच्या राज्यातील परीक्षा केंद्र

    महाराष्ट्रातले सुमारे चार लाख विद्यार्थी देतायेत NTPC परीक्षा

    कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात मिळालीत परीक्षा केंद्र

    रेल्वेने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची तिकीट आणि राहण्याची व्यवस्था करण्याची राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेसची मागणी

  • 07 Jun 2022 03:09 PM (IST)

    तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कांद्याचे तोरण

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाजपने बांधले तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कांद्याचे तोरण

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मुख्यमंत्र्यांकडे भाजपची मागणी..

    चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने कांद्याची लागवड करतात.

    परंतु सद्ध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात.

    शासनाकडून शेतकऱ्यांना मदत किंवा मोठे आर्थिक अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार व कृषी अधिकारी यांना भाजपच्या वतीने निवेदन.

    शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा भेट देवून मागणी केली आहे

  • 07 Jun 2022 03:05 PM (IST)

    राष्ट्रवादीच्या नगरसेवकासाठी पुण्यात काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षांचा पुढाकार

    जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मातंग समाजाचा एल्गार मोर्चा

    सुभाष जगताप यांच्यावरील खोट्या कारवाईच्या निषेधार्थ काढला मोर्चा

    महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याच्या अंगावर गेल्याचा व्हीडीओ झाला होता व्हायरल

    मातंग समाजाचं शिष्टमंडळ शरद पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यांना भेटणार

    खोटी कारवाई न थांबवल्यास मातंग समाज राज्यभर आंदोलन करणार दिला इशारा !

    सुभाष जगताप यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आरोप

  • 07 Jun 2022 03:04 PM (IST)

    राज्यसभा निवडणुकीसाठी हलचाली वाढली

    सेना आमदार हॉटेल रिट्रिटमधून ट्रायडंटकडे निघाले

    अपक्ष आणि मित्रपक्षांशी चर्चेच्या फेऱ्या

    अपक्ष आणि मित्रपक्षांची साथ कुणालाा मिळणार

  • 07 Jun 2022 02:39 PM (IST)

    सपाचे उमेदवार रईस शेख आणि अनिल परब यांच्यात चर्चा

    - अनिल परब माझे मित्र आहेत, त्यामुळे भेट होत असतात

    - ज्या किमान समान कार्यक्रमावर ही सरकार बनली त्यापासून वेगळी झालीय?

    - सर्व धर्माला सोबत घेऊन चालणार, हे या सरकारच्या किमान समान कार्यक्रमात होतंय.

    - गेल्या काही वर्षांत मुख्यमंत्री हिंदूत्त्व हिंदूत्व करत आहेत. त्यामुळे हे सरकार सेक्यूलर राहीलं का? याबाबत महाविकास आघाडी सरकारने स्षष्ट करावे

    - अडीच वर्षांत अल्पसंख्यांकांसाठी काय केलं? हे विचारण्याची वेळ आलीय. यात गैर काय

    - महाविकास आघाडी सरकारने बोलावलेल्या आजच्या बैठकीत जाणार असं वाटत नाही

    - भाजपसोबत आमची वैचारीक बाब जुळत नाही

    - अडीच वर्षांत सरकारमध्ये बदल झालाय.

    - या सरकारचं सेक्यूल तत्व कायम असणार का?

    - सरकारकडून उत्तरं मिळाली नाही, तर सपाची भुमिका अबू आझमी ठरवणार

    - पक्षप्रमुख म्हणुन काय भुमिका मांड

    लोक आम्हाला विचारतील

    लोक ओपन आम्हाला विचारतील

    सपाचे उमेदवार रईस शेख आणि अनिल परब यांच्यात चर्चा

    समाधान होण्याचं कारण नाही

    समाजवादी पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे

    कारण ही वैचारिक लढाई आहे

    लोक भेटतात आणि आणि बोलतात

    अडीच वर्षात झालेला बदल सरकारने लक्षात घ्यावा

    देशात आता दोन विचारधारा आहेत

    आम्ही सगळ्यांना साथ घेऊन जाणार

    तुम्ही त्याचा स्थापण का केली नाही

  • 07 Jun 2022 02:30 PM (IST)

    पश्चिम महाराष्ट्र मनसे विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन

    - पश्चिम महाराष्ट्र मनसे विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन,

    - गजानन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक,

    - पुणे शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन,

    - आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन,

    - लाईव्ह फ्रेम दिलीय

  • 07 Jun 2022 01:59 PM (IST)

    नाशकात नितेश राणेंच्या नेतृत्वात भाजपचा मोर्चा ला सुरुवात

    नाशिक - - नाशकात नितेश राणेंच्या नेतृत्वात भाजपचा मोर्चा ला सुरुवात - सोशल मीडियावर शिवलिंग विटंबना प्रकरणी पोलीस कारवाई करत नसल्याचा भाजपचा आरोप - पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचा मोर्चा - नितेश राणे यांच्यासह अन्य हिंदुत्ववादी संघटनाही मोर्चात सहभागी - बी.डी. भालेकर मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - मोर्चानंतर नितेश राणे यांची पत्रकार परिषद

  • 07 Jun 2022 01:17 PM (IST)

    महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील

    महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील

    बैठकीला मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतील

    छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांशी चर्चा सुरू आहे

    नाराज आमदारांनी व्यक्त केली होती.

    आमदारांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता

  • 07 Jun 2022 01:10 PM (IST)

    पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे एका अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार, आरोपी फरार

    पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे एका अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार.....

    शिरुर येथील कोर्टाच्या परिसरात गोळीबार.....

    दोन महिलेंवर अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार....

    गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार.....

  • 07 Jun 2022 12:30 PM (IST)

    नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच

    - नाशिकमध्ये हत्येचं सत्र सुरूच - अंबड परिसरात तरुण उद्योजकाची हत्या - अवघ्या १८ दिवसात शहरात ८ हत्या - हत्येच्या घटनेनं नाशिक हादरल - गेल्या २ दिवसात ३ जणांवर शहरात प्राणघातक हल्ले

  • 07 Jun 2022 12:29 PM (IST)

    आम्हाला शहराचं नाव बद्दलण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीत - चंद्रकांत खैरे

    इम्तियाज जलील यांना माहीत नाही की 8 मे 1988 ला मी 36 वर्षांचा होतो, आणि नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो आणि इम्तियाज मात्र त्यावेळी लहान असावा

    (हाताने ईशारा करून छोटा छोटा असल्याचं दाखवलं)

    आम्हाला शहराचं नाव बद्दलण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीत

    नाव बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांचा आहे ते जरूर बदलतील

    देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण ढोंगी आहे, ते मुख्यमंत्री असताना मी अनेक पत्र दिली मात्र त्यांनी नाव बदललं नाही

    आमचे नेते राज्यसभा विधानपरिषदेत बिझी आहेत, आज सायंकाळी हे सगळे नेते औरंगाबादेत दाखल होतील

    आम्ही कुणाला डांबून ठेवलं नाही

    आम्ही एमआयएमशी संपर्क केला नाही इम्तियाज खोटं बोलत आहे.

  • 07 Jun 2022 12:20 PM (IST)

    आमदार राहिलोय, मंत्री राहिलोय

    आमदार राहिलोय, मंत्री राहिलोय

    दुपारी एक वाजता मुख्यमंत्र्यांची भेट

    जी जबाबदारी देतील ते स्विकारणार

    आज आम्ही एकत्र असल्याचा आनंद आहे

  • 07 Jun 2022 11:48 AM (IST)

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा

    कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यामुळे बजावल्या नोटिसा

    भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी 12 वाजता बोलावले सिटी चौक पोलीस ठाण्यात

    70 ते 80 भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्याचा भाजपचा दावा

  • 07 Jun 2022 11:48 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा

    कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यामुळे बजावल्या नोटिसा

    भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी 12 वाजता बोलावले सिटी चौक पोलीस ठाण्यात

    70 ते 80 भाजप कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्याचा भाजपचा दावा

  • 07 Jun 2022 11:32 AM (IST)

    महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील - उदय सामंत

    योग्य तो निर्णय नक्की घेतील

    महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील

    आम्ही सगळे एकत्र राहू असं मला वाटतंय

    उद्धव ठाकरे हे सगळे निर्णय घेत असतात

    मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल

    त्या सभेत त्या काय बोलणार हे मला माहित नाही

    संभाजी नगरची सभा ही अति विराट होईल

    आम्ही मंत्री म्हणून नक्की दूर करू...

  • 07 Jun 2022 11:29 AM (IST)

    सगळ्याच पक्षाचे नेते अशा निवडणुकांना एकत्र येत असतात.

    त्यांचे आमदार पक्षाच्या कार्यालयात बसले आहेत का?

    ही एक व्यवस्था केलेली आहे

    सगळ्याच पक्षाचे नेते अशा निवडणुकांना एकत्र येत असतात...

    आमदारांना मतदान संदर्भात काही सूचना द्यायच्या असतात विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांच्या काही प्रक्रिया ह्या खूप तांत्रिक असतात त्या संदर्भात आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं.

    अशाप्रकारे भारतीय जनता पक्षाने आपले आमदार ठेवलेले आहे

    त्यासाठी थोबाडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावं असं काय आहे

    तुमचं ते गेट-टुगेदर आणि आमचं ते आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो

    हे प्रश्न मीडियासमोर चर्चा करण्यासारखे नाहीत शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महा विकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील कोण काय बोलतील काय टोमणे मारताय काय पिना मारतय त्याच्या जवळ जाऊ नका दहा तारखेला सर्व चित्र स्पष्ट होईल

    संजय राऊत ओन नुपूर शर्मा :

    प्रथमच या देशाला माफी मागावी लागली त्यांनी अत्यंत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत प्रथमच एका लहान देशाकडून मोठ्या देशाला माफी मागण्याचा आग्रह केला जातो आहे भाजपने ज्या प्रकारचे विचार देशांमध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यातून त्यांचे नियंत्रण सुटला आहे त्यांच्या लोकांवरच आणि हे लोक धर्मा धर्मात तेढ निर्माण करत आहेत आणि देशाची बदनामी सुरू आहे

    संजय राऊत ओन आयोध्या दौरा :

    आयोध्या ची तयारी उत्तम सुरू आहे अजूनही आमचे पन्नास लोक काम करत आहेत संध्याकाळी जो महाआरती चा कार्यक्रम आहे शरयू तीरावरी त्याच्यावरती फार लक्ष दिले जात आहे हा नेत्रदीपक असा सोहळा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्हावा यासाठी शिवसैनिक तिथे काम करत आहेत संभाजीनगर ला उद्या सभा आहे म. पक्षाचे नेते आदरणीय उद्धवजी ठाकरे त्याठिकाणी संबोधित करतील आणि मराठवाड्यातल्या शिवसैनिकांना नेत्यांना ही सभा ऐतिहासिक व्हावी यासाठी खूप कष्ट घेतले आहेत . संजय राऊत ओन संभाजी नगर नामकरण मनसे टीका;

    मनसेने या संदर्भात त्यांचे माताश्री पिताश्री भाजपमध्ये आहेत त्यांना हा प्रश्न विचारावा केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे आणि राज्याकडून हा प्रस्ताव गेलेला आहे

  • 07 Jun 2022 11:14 AM (IST)

    काॅग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा रत्नागिरी दौरा रद्द

    रत्नागिरी- काॅग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा रत्नागिरी दौरा रद्द राज्यसभेच्या पाश्वभूमीवर मुंबईतल्या काॅग्रेसच्या बैठकिमुळे दौरा रद्द नाना पटोले आज रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा दौऱ्यावर कुणबी पतसंस्थेच्या कार्यालयाचे करणार होते उदघाटन राज्यसभेच्या निवडणुकीच्या घडामोडीमुळे नानाचा दौरा रद्द

  • 07 Jun 2022 10:41 AM (IST)

    सेनेकडून विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवींचं नाव

    सेनेकडून विधानपरिषदेवर सचिन अहिर आणि आमशा पाडवींचं नाव

  • 07 Jun 2022 10:40 AM (IST)

    सलमान खान धमकी प्रकरण..

    सलमान खान धमकी प्रकरण..

    दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटकेत असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची चौकशी केली..

    सूत्रांच्या माहितीनुसार, लॉरेन्स बिष्णोईने चौकशीत सांगितलं की त्याने सलमान खान किंवा त्याच्या वडिलांना धमकीच लेटर पाठवलं नाही.

    त्याने भूतकाळात सलमान खानला धमकी दिली होती, गँगचा सदस्य संपत नेहरा याच्या माध्यमातून धमकी दिली होती मात्र या धमकीच्या पत्राशी त्याचा संबंध नाही..

    मागच्या धमकीच्या वेळीही त्याने अस कोणतही पत्र दिल न्हवत.

    पत्रात असलेल्या LB आणि GB चा लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी बरारशी संबंध नाही - बिंशोईची चौकशीत पोलिसांना माहिती.

    बिष्णोईने चौकशीत असंही सांगितलं की हे धमकीच पत्र म्हणजे दुसऱ्या कुठल्या गॅंगच किंवा पब्लिसिटी स्टंट असू शकतो..

  • 07 Jun 2022 10:28 AM (IST)

    प्रथम या देशाला माफी मागावी लागली - संजय राऊत

    आपल्याकडे चुकीची माहिती आहे

    खुल्लं मतदान आहे

    सगळे आमदार काल उपस्थित होते

    प्रथम या देशाला माफी मागावी लागली

    तीव्र भावना व्यक्त केली आहे

    यापुढे अशा हिंमत कोणी केली नव्हती

    ते भेटी घेतात, आम्ही घेतली म्हणून काय झालं...

    पहिल्यांदा असं झालंय...देशाला माफी माघावी लागली आहे

    अयोध्येमध्ये चांगली तयारी सुरू आहे

    सोहळा चांगला होण्यासाठी ते काम करीत आहेत

  • 07 Jun 2022 10:20 AM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी चंदीगडमध्ये दाखल, सिद्धू मूसावाला यांच्या कुटुंबियांची घेणार भेट

    काँग्रेस नेते राहुल गांधी चंदीगडमध्ये दाखल,

    सिद्धू मूसावाला याच्या कुटुंबियांची राहुल गांधी आज घेणार भेट

    मुसावाला याच्या निवासस्थान परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त

  • 07 Jun 2022 10:03 AM (IST)

    तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न अश्विन वसंत पवार असं या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू अश्विन पवार हे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नियुक्तीला महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर ही वेळ आलाचा आरोप अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत, महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम क्रिस्टल या संस्थेकडे

    तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

    अश्विन वसंत पवार असं या सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू

    अश्विन पवार हे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात नियुक्तीला

    महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर ही वेळ आलाचा आरोप

    अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत,

    महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम क्रिस्टल या संस्थेकडे

  • 07 Jun 2022 10:03 AM (IST)

    समाजवादी पक्षाकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातुन समाजवादी पक्षाच्या आमदारांना फोन

    ब्रेक - समाजवादी पक्षाकडून नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातुन समाजवादी पक्षाच्या आमदारांना फोन- सुत्रांची माहीती

    आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची मुख्यमंत्र्यांकडून विनंती - सुत्र

    पत्रातील मागण्यांचा सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिल्याची माहिती- सुत्र

    समाजवादी पक्षाकडून मात्र मागण्यां जोपर्यत मान्य होतं नाहीत तोपर्यंत तटस्थ राहण्याची भुमिका - सुत्र

    समाजवादी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मुस्लिम आरक्षण, हज कमिटीच्या सीईओ पदाची नियुक्ती, अल्प संख्याक विभागासाठी निधी बाबत मागणीचा उल्लेख…

    अबू असम आझमी हे आपल्या मतांवर अजूनही ठाम…

  • 07 Jun 2022 09:33 AM (IST)

    वसंत मोरेंचे कट्टर समर्थक मनसेच्या माथाडी सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझिरेंचा पक्षाला जय महाराष्ट्र,

    - वसंत मोरेंचे कट्टर समर्थक मनसेच्या माथाडी सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझिरेंचा पक्षाला जय महाराष्ट्र,

    - पक्ष सोडतांना माझिरे यांचा मनसेतील दोन नेत्यांवर गंभीर आरोप,

    - साईनाथ बाबर आणि बाबू वागस्कर यांच्यामुळे मी पक्ष सोडल्याचा माझिरेंचा आरोप,

    - मी वसंत मोरेंचा समर्थक असल्यानं कोअर कमिटीने मला डावल्याचाही माझिरेंचा आरोप,

    - निलेश माझिरे आता सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा.

  • 07 Jun 2022 09:32 AM (IST)

    पुराव्यांचा प्रश्नच नाही, त्यांचेच पेपर त्यांना दाखवले - किरीट सोमय्या

    - पुराव्यांचा प्रश्नच नाही, त्यांचेच पेपर त्यांना दाखवले… एक्शन घ्यायचीय तर अनिल परबवर घ्या, ग्राम पंचायत म्हणतंय…

    - हे म्हणत असतील की अनिल परबवर कारवाई करा तर खरं कोण ते अनिल परबने पाहावे…

    - ५७ कोटींचा आरोप विक्रांत घोटाळ्यात केला, ५७ पैशांचे कागद दिले नाही…

    - जनतेचा सरकारचा वसूलीचा पैसा आलाय त्याच पैशांचा वापर स्वताच्या आमदारांना विकत घेण्यासाठी ऊद्धव ठाकरे करत आहेत… असं पहिल्यांदा घडतंय…

    - लोकं प्रश्न विचारू लागलेयत, स्वताच्या आमदारांना बिकाऊ म्हणतात… काय चाललंय काय?

    - घोडेबाजार कोण करतंय, संजय राऊत अनिल परब आणि इतर अलिबागचा खोलीत काय करतात हे त्यांना माहीत…

    - वाझेच्या वसुलीचा पैसा वापरला जातोय, राज्याची जनता माफ करणार नाही…

    - ऊद्धव ठाकरेंचे घोटाळे आम्ही मार्गी लावतोय, १ डजन लोकायुक्तांकडे आहे, बोगस कंपन्याविरोधात न्यायालयात गेलोय, विश्वास आहे की चौकशीचे आदेश होतील

  • 07 Jun 2022 09:31 AM (IST)

    राजधानी नवी दिल्लीत आज उष्णतेचा दिवस

    राजधानी नवी दिल्लीत आज उष्णतेचा दिवस

    राजधानी नवी दिल्लीला आज यलो अलर्ट

    आजचे तापमान 45 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता

    नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे दिल्ली महापालिकेच आवाहन

  • 07 Jun 2022 09:11 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मंदिरांसाठी ३३ कोटींचा निधी..

    पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक मंदिरांसाठी ३३ कोटींचा निधी..

    - मोरगाव, रांजणगाव, थेऊर आणि ओझर येथील मंदिरांचा होणार कायापालट..

    - पुरातत्व विभागाने तयार केला अष्टविनायक मंदिरांचा क्षेत्र आराखडा..

    - ३३ कोटी ५७ लाख रुपयांच्या खर्चाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मान्यता..

    - चारही मंदिरात होणार विविध कामे, भाविकांसाठी उपलब्ध केल्या जाणार विविध सुविधा..

    - अष्टविनायक मंदिरांना येणार नवी झळाळी..

  • 07 Jun 2022 08:07 AM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचा चौथा टीजर जारी, हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर...

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सभेचा चौथा टीजर जारी

    हिंदुत्वाचा गजर चलो संभाजीनगर असं सांगणारा टीजर जारी

    टीजर मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचे फोटो आणि व्हिडीओ

    औरंगाबाद नाही संभाजीनगर आम्ही दिलंय बाळासाहेब ठाकरे यांचं टीजर मध्ये वक्तव्य

    मुख्यमंत्रताच्या सभेला स्वाभिमान सभा असे टीजर मध्ये दिलं नाव

  • 07 Jun 2022 08:04 AM (IST)

    आरटीओ कार्यालयात आता एजंटची गरज राहणार नाही, आरटीओ कार्यालयात तयार झाला हेल्प डेस्क

    आरटीओ कार्यालयात आता एजंटची गरज राहणार नाही

    नागपूर आरटीओ कार्यालयात तयार झाला हेल्प डेस्क

    हेल्प डेस्क वरून मिळणार सगळी ऑन लाईन कामांची माहिती

    आरटीओ कार्यालयात हेल्प डेस्क नसल्याने नागरिकांना एजंट ची घ्यावी लागायची मदत

    त्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांची लूट व्हायची

    हे सगळं थांबविण्यासाठी उचलण्यात आले पाऊल 84 ऑन लाईन सेवा ची मिळणार माहिती

  • 07 Jun 2022 07:28 AM (IST)

    कोरेगाव भीमा आयोगासमोर विभागीय आयुक्त सौरभ राव यांची साक्ष नोंदवली,

    - कोरेगाव भीमा आयोगासमोर विभागीय आयुक्त सौरभ राव यांची साक्ष नोंदवण्यात आली,

    - कोरेगाव भीमा हिंसाचारावेळी सौरभ राव हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते,

    - ऐतिहासिक स्तंभाच्या जागेचा ताबा याबाबत राव यांची उलट तपासणी घेण्यात आली,

    - सोमवारी दिवसभर सौरभ राव यांची साक्ष नोंदवण्यात आली.

  • 07 Jun 2022 07:23 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात 5 लाख 94 हजार पशुधनाला दिला जाणार मान्सून पूर्व लसीचा डोस....

    अमरावती जिल्ह्यात 5 लाख 94 हजार पशुधनाला दिला जाणार मान्सून पूर्व लसीचा डोस....

    जनावरांवरील घटसर्फ, एकटांग्या,आंत्रविषार रोगप्रतिबंधल लसी..

    मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग अलर्ट...

    जिल्हा परिषदेच्या 100 व राज्य शासनाच्या 69 पशु दवाखान्यात दिली जाणार जनावरांना लस...

    जिल्ह्यात 30 जून पर्यत राहणार लसीकरण सुरू...

  • 07 Jun 2022 07:22 AM (IST)

    दीड वर्षात पुणे म्हाडाकडून तब्बल 20 हजार 874 घरांचे आणि 67 भूखंडाचे वाटप,

    - दीड वर्षात पुणे म्हाडाकडून तब्बल 20 हजार 874 घरांचे आणि 67 भूखंडाचे वाटप,

    - सप्टेंबर 2020 ते मे 2022 या कालावधीत तब्बल 20 हजार 874 घरांचे वाटप,

    - कोरोना असताना देखील म्हाडाकडून घरवाटपाचा उपक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू ठेवण्यात आला,

    - पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांची माहिती

  • 07 Jun 2022 07:22 AM (IST)

    शहरात पुन्हा ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ

    - शहरात पुन्हा ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ,

    - यातील बहुतांश रुग्णांना कोरोनानिदान होत नाही, हे दिलासादायक,

    - मात्र आता परत मास्कचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा आणि ताप आल्यास तातडीने उपचार घ्या, वैद्यकीय तज्ज्ञांनी सल्ला,

    - दरम्यान शहरात गेल्या मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सौम्य वाढ

  • 07 Jun 2022 07:21 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा दौरा

    गडचिरोली जिल्ह्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा दौरा

    गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसोबत करणार आज बैठक

    पोलीस अधीक्षक कार्यालय येथे विविध उपक्रमांचा घेणार आढावा

    पोलीस अधीक्षक कार्यालय सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नक्षलग्रस्त व सुशिक्षित बेरोजगारांना अनेक वेगवेगळ्या उपक्रमाच्या कार्यक्रम आयोजित

  • 07 Jun 2022 07:20 AM (IST)

    महापालिका निवडणुकीत 31 मे पर्यंत नोंदणी झालेल्यांचेच मतदान होणार

    महापालिका निवडणुकीत 31 मे पर्यंत नोंदणी झालेल्यांचेच मतदान होणार

    निवडणुका लवकरच लागण्याचे संकेत

    17 जून रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार

    25 जून पर्यंत आक्षेप नोंदविता येतील

    प्रभाग निहाय अंतिम यादी घोषित झाल्या नंतर बूथ निहाय मतदार यादी घोषित होईल

    7 जुलै पर्यंत प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी येण्याची शक्यता

    त्यामुळे आता निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

  • 07 Jun 2022 07:19 AM (IST)

    राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला विक्रमी पर्यटकांची भेट

    - राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला विक्रमी पर्यटकांची भेट,

    - यंदाच्या सुट्टीतील पर्यटकांची ही विक्रमी संख्या असून गेल्या रविवारी वीस हजार पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला दिली दिली,

    - करोना संसर्गामुळे दोन वर्षे प्राणिसंग्रहालय बंद होते.,

    - करोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर १४ मार्च रोजी प्राणिसंग्रहालय खुले करण्यात आले.

  • 07 Jun 2022 06:40 AM (IST)

    अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

    - अंगावर वीज पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू..

    - शेतकऱ्यासह दोन बैलांचाही मृत्यू... - नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथील घटना.. - शेतातून घरी परतत असताना घडली घटना.. - शांताराम सकाहारी निकम असे मयत शेतकऱ्याचे नाव.. - तळवाडे शिवारात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस..

  • 07 Jun 2022 06:39 AM (IST)

    मालेगाव शहरातील महिलांचा प्रभाग कार्यालयात ठिय्या

    मालेगाव शहरातील महिलांचा प्रभाग कार्यालयात ठिय्या...

    दूषित येत पाण्याच्या येत असल्याने महिला संतप्त..

  • 07 Jun 2022 06:39 AM (IST)

    अपघातग्रस्त टॅंकरच्या गॅस गळतीने २३०० बॉयलर कोंबड्यांचा मृत्यू.

    अपघातग्रस्त टॅंकरच्या गॅस गळतीने २३०० बॉयलर कोंबड्यांचा मृत्यू...

    मृत कोंबड्यांचे लिव्हर व फुफ्फुसे डॅमेज..

    मालेगाव तालक्यातील सौंदाणे शिवारातील घटना...

Published On - Jun 07,2022 6:34 AM

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.