AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज काँग्रेसचा दिल्लीत पुन्हा एल्गार

| Updated on: Oct 30, 2026 | 8:20 AM
Share

Maharashtra News LIVE : मुख्य निडवणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेससह इंडिया ब्लॉकने पुन्हा आंदोलन छेडले आहे. आज विरोधी पक्ष निवडणूक आयुक्तांविरोधात जन महाभियोग चालवणार आहेत. तर राज्यातील आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Maharashtra News LIVE : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज काँग्रेसचा दिल्लीत पुन्हा एल्गार
टीव्ही ९ मराठी ब्लॉग

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Oct 2026 09:00 AM (IST)

    स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीचा मार्ग मोकळा, ओबीसी टक्का घसरणार

    सर्वोच्च न्यायालयाच्या ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या आदेशानुसार निवडणुका झाल्यास नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसींच्या ५ जागा कमी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील रखडलेल्या २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम पुढील महिन्यात पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

  • 30 Oct 2026 08:50 AM (IST)

    मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या चाचण्यांना वेग, डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू होण्याची शक्यता

    मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या चाचण्यांना वेग आला आहे. डिसेंबरपर्यंत मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गावरील साईबाबा नगर ते शहीद भगतसिंग उद्यान या टप्प्यात महत्त्वाच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये मेट्रोचा वेग, ब्रेक, धावताना होणारे कंपन आणि मेट्रोचे संतुलन तपासण्यात येत आहे. मेट्रोचे सिग्नल, वीजपुरवठा, ओव्हरहेड वायर आणि सुरक्षित अंतर राखणारी यंत्रणाही तपासली जात आहे. सर्व चाचण्या आणि सुरक्षा तपासणी पूर्ण होऊन आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर डिसेंबरपर्यंत मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्या साठी मेट्रो मार्ग ९ चे पुढं चे पाऊल. भविष्यात या मेट्रो चा विस्तार वसई विरार पर्यंत होणार आहे

  • 30 Oct 2026 08:40 AM (IST)

    जाहिरात बाजी करत दुष्काळग्रस्तांना होणार दिवाळी किटचे वाटप-रविराज साबळे

    जाहिरात बाजी करत दुष्काळग्रस्तांना होणार दिवाळी किटचे वाटप करण्यात येत आहे. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मोठे मोठे बॅनर लावून पुण्यातून मतदारसंघाकडे टेम्पो रवाना झाले आहेत. मतदार संघातून सावंतावर टिकेची झोड, दिवाळी किट जाहिरात करण्यासाठी देताय का? रविराज साबळे यांनी सवाल केला. आश्वासन दिलेलं पाणी तुम्ही मतदारसंघात आणला असतं तर आम्हाला तुमच्या पाच किलो साखर ची गरज लागली नसती असा टोलाही साबळे यांनी लगावला.

  • 30 Oct 2026 08:30 AM (IST)

    चंद्रपूर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र धुक्याची चादर

    सकाळी लवकर घराबाहेर पडलेल्या अनेकांनी अनुभवलं धुक्याच्या चादरीचं मनमोहक दृश्य दिसेल. अर्णब चक्रीवादळमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात आणि आद्रतेत मोठा बदल झाल्यामुळे चंद्रपुरात ही धोक्याची चादर पसरल्याचं मानलं जात आहे.गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे वातावरणातील आद्रतेत मोठी वाढ झाली आहे.दिवसा असलेलं जास्त तापमान आणि पहाटेच्या वेळी या तापमानात झालेली मोठी घट यामुळे हे धुकं तयार होतं.

  • 30 Oct 2026 08:20 AM (IST)

    नाशिकमध्ये ‘नगरपरिक्रमा’चे विशेष आयोजन

    नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ‘नगरपरिक्रमा’चे विशेष आयोजन करण्यात आले आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ तथा सिंहस्थ समितीच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नगरपरिक्रमा करण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता या परिक्रमेला तपोवनातून प्रारंभ होणार आहे. कुंभमेळ्याचा मुख्य ध्वज श्री काळाराम मंदिरातून आज दुपारी १ वाजता तपोवन मैदानावर आणणार. दुपारी २ वाजता परिक्रमा सुरू होईल सायंकाळी ७ वाजता परिक्रमा रामकुंडावर पोहोचल्यावर महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 30 Oct 2026 08:10 AM (IST)

    मुंबई उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात

    मुंबई उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून रस्ते ओले झाले आहेत.अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा उपनगरातील कांदिवली – मालाड परिसरात थेंब थेंब पावसाला सुरुवात झाली आहे.

  • 30 Oct 2026 08:03 AM (IST)

    ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस पुन्हा मैदानात

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस पुन्हा मैदानात उतरली आहे. आज दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. अभासी खटला आणि अभासी महाभियोग चालवला जाणार आहे. आज दुपारनंतर काँग्रेसची रॅली निघेल. तर संध्याकाळी अभासी महाभियोग खटला चालवला जाणार आहे. यावेळी इंडिया आघाडीतील सर्व खासदार हजर असतील. या रॅलीत सीजेपीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसह इंडिया आघाडीने पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. आज दिल्लीत होणार्‍या रॅलीत सीजेपी पक्षाचे नेते अभिजीत दिपके आणि इतर नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया ब्लॉक जन महाभियोग चालवणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार चर्चा आहे. आज लोकअदालत भरवली जाणार आहे. त्यात अभासी खटला चालवला जाईल. या सर्व घडामोडींचे लाईव्ह स्ट्रीमिंग, थेट प्रसारण करण्यात येणार आहे. तर उद्या 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिवाळीपूर्वीच दिल्ली दणाणून सोडण्यात येणार आहे.

तर आज शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता त्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. दोन हजार रुपयांचा हप्ता त्यांना मिळेल. तर दुसरीकडे राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम रक्कम देण्याची घोषणा केलेली आहे. ही रक्कमही थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. इतर मागासवर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत, अशी स्पष्ट भूमिका घेत न्यायालयाने या निवडणुका जुन्या अंतरिम व्यवस्थेनुसार तातडीने घेण्याचे आदेश दिले आहेत.

तर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त एकत्र आले. नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निकालानंतर एकाच कार्यक्रमात हे तिघे एकत्र आले. यावेळी त्यांनी राजकीय कोपरखळ्याही मारल्या. राजकीय चिमटेही काढले. याची राज्यभर चर्चा रंगली. दरम्यान विधान परिषदेच्या निकालावरून शिंदे सेना आणि भाजपमधील वाद समोर आले आहेत.

Published On - Oct 30,2026 8:00 AM

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं