AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप घराच्या कुठल्याही कोपऱ्यात लपू द्या, 2 मिनिटांमध्ये बाहेर पडेल, आदिवासी लोकांची ही सोपी ट्रिक माहितीये का?

पावसाळा आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप अनेकदा घरात शिरतात. असे साप घरामध्ये जिथे अडचण आहे, अशा ठिकाणी लपून बसतात. अशावेळी सापांना बाहेर काढण्यासाठी आदिवासी समाजाकडून एका खास युक्तिचा वापर केला जातो.

साप घराच्या कुठल्याही कोपऱ्यात लपू द्या, 2 मिनिटांमध्ये बाहेर पडेल, आदिवासी लोकांची ही सोपी ट्रिक माहितीये का?
SnakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 8:35 PM
Share

पावसाळा आणि उन्हाळा हे दोन असे ऋतु आहेत, ज्या काळात साप हे अनेकदा तुमच्या घरात देखील घुसू शकतात. हिवाळ्यामध्ये त्या मानाणे धोका कमी असतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे हिवाळ्यात थंडी असते, त्यामुळे साप हे बिळात लपून बसतात. परंतु पावसाळ्याच्या काळात पाणी बिळात शिरल्यामुळे सापांना बिळात लपणं अशक्य असतं, तसेच काही वेळेला तर पावसासोबत वाहून आलेल्या जोरदार मातीमुळे देखील सापांची बिळं बुजली जातात. त्यामुळे साप सुरक्षित जागेचा शोध घेतात. उन्हाळ्यामध्ये देखील अशीच परिस्थिती असते. उन्हामुळे जमीन प्रचंड तापते,  त्यामुळे बिळांमध्ये सापांना उष्णतेचा त्रास होतो. सापांना उन्हाचा त्रास झाल्यामुळे ते बिळातूून बाहेर पडतात, आणि थंड जागेचा शोध घेतात. बिळातून बाहेर पडलेले साप अनेकदा तुमच्या घरात देखील घुसू शकतात.

तुमच्या घरात जिथे अडचण आहे, अशा ठिकाणी साप दबा धरून बसतात. घरातील अंधाऱ्या भागात साप आश्रय घेतात. त्यामुळे ते लवकर आपल्या नजरेला देखील पडत नाहीत. अशा वेळी सापांना बाहेर काढण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. जे आदिवासी लोक पाड्यावर राहतात, जंगलामध्ये राहतात ते या ट्रिकचा वापर नियमितपणे करत असतात. त्यामुळे समजा जरी त्यांच्या घरात एखादा साप लपलेला असेलच तर तो लगेच बाहेर पडतो. सापांना या वासाचा त्रास सहन होत नाही. आदिवासी लोक जे मृत प्राणी असतात, त्यांची शिंगे जाळतात. या वासाचा सापाला त्रास होतो, त्यामुळे ते घरात कुठेही असतील तर लगेच घरातून बाहेर पडतात.

त्यामुळे आजही आदिवासी लोक समजा त्यांचा एखादा पाळीव प्राणी मृत पावला तर त्याची शिंगे जपून ठेवतात. ही शिंग घरात जाळल्यामुळे घरात जर साप असेल तर तो घरातून दूर निघून जातो. सापांपासून घराचं संरक्ष होतं. विशेष: उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये साप घरात घुसण्याचं प्रमाण हे अधिक असतं. तसेच साप बागेमध्ये देखील लपून बसू शकतात. जर तुम्हालाही असाच कुठे साप आढळला तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका, त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते त्याला सुरक्षित जागी सोडतील.

Follow Us
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा