AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीबीआयचे ८१.६६ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी छापे, काय नेमके प्रकरण ?

पुण्यात सीबीआयने ८१.६६ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी छापे टाकले आहेत. या छाप्यात कंपनीचे कार्यालय, संचालकांशी संबंधित निवासस्थानांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

सीबीआयचे ८१.६६ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी छापे, काय नेमके प्रकरण ?
cbi news
| Updated on: Oct 29, 2026 | 8:40 PM
Share

सीबीआयने पुण्यात ८१.६६ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी छापे टाकले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून हे छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणात CBI ने ‘आज का आनंद पेपर्स प्रा. लि.’ विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे संचालक आणि अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात येत आहे. निधीचा अपहार, हिशेबात फेरफार आणि बँकेची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात ठेवण्यात आला आहे.

८१.६६ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी CBI ने पुण्यातील ‘आज का आनंद पेपर्स प्रा. लि.’ विरोधात गुन्हा दाखल केला असून आज संस्थेवर आणि बँक अधिकाऱ्यांवर छापे टाकण्यात आले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून कंपनीचे संचालक आणि अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.बँकिंग नियमांचे उल्लंघन करून निधी अन्य खात्यांमध्ये वळवल्याचा आरोप या प्रकरणात ठेवण्यात आला आहे. पुण्यातील कंपनीच्या कार्यालयांसह संचालकांशी संबंधित निवासस्थानांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यांमध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा CBI चा पुढील तपास सुरु राहणार आहे.

२१० कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी CBI चा गुन्हा

चंद्रा प्रोटेको लिमिटेड कंपनीविरोधात २१०.१३ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी CBI ने गुन्हा दाखल केला आहे. इंडियन बँकेच्या मुंबईतील स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीचे संचालक रंजीत गुप्ता, अनिलेश गुप्ता आणि अपर्णा गुप्ता यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहे. सहा बँकांच्या समूहाकडून ५४१.४६ कोटींची कर्ज सुविधा घेतल्याचा आरोप आहे. कर्जाच्या निधीचा गैरवापर, अन्य कंपन्यांमार्फत निधी वळवल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे संचालकांशी संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Follow Us
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा