AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगाव महापालिकेत खळबळ ! आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह तिघांना अटक; निवृत्तीच्या एक दिवस आधी ACB ची कारवाई

मालेगाव मनपा आयुक्त रवींद्र जाधव, स्वीय सहाय्यक आणि अकाउंटंटला ACB ने अटक केली आहे. ठेकेदाराच्या कामांची बिलं मंजूर करण्यासाठी २० लाखांवरून ४ टक्के लाच मागितल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली. सेवानिवृत्तीच्या अवघ्या एक दिवस आधी आयुक्तांवर झालेली ही कारवाई मालेगाव महानगरपालिकेत मोठी खळबळ उडवणारी आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

मालेगाव महापालिकेत खळबळ ! आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह तिघांना अटक; निवृत्तीच्या एक दिवस आधी ACB ची कारवाई
| Updated on: Oct 29, 2026 | 8:22 PM
Share

मालेगाव महानगरपालिकेत मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह त्यांच्या स्वीय सहाय्यक निलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंबर यांना अटक केली आहे. ठेकेदाराच्या कामांची बिलं मंजूर करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, आयुक्त रवींद्र जाधव हे 31 ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे मालेगाव महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गवत काढण्याच्या आणि जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांची बिले अदा करण्यासाठी ठेकेदाराकडे लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. दोन वेगवेगळ्या कामांची सुमारे 20 लाख रुपयांची बिलं मंजूर करून देण्यासाठी चार टक्के लाच मागण्यात आली होती असा आरोप आहे. या तक्रारीची दखल घेत ACB ने कारवाई केली. या प्रकरणी आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहाय्यक निलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंबर यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींच्या घरांची झडती सुरू

या कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संबंधित आरोपींच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी काही माहिती समोर येते का, याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान, आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्गातही चर्चेला उधाण आले आहे.

या संपूर्ण कारवाईबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांनी माहिती दिली आहे. तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ठेकेदाराच्या बिलांचे पैसे अदा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, झडतीदरम्यान काय माहिती समोर येते आणि तपासात आणखी कोणते तपशील उघड होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा