AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Chairman Election : गोकुळमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, अध्यक्षाची एकतर्फी निवड, पडद्यामागे काय घडलं? घडामोठी वाढल्या

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या राजकारणात नवा पेच निर्माण झाला आहे. बहुमताच्या जोरावर शशिकांत पाटील युचेकर यांची निवड केल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला.

Gokul Chairman Election : गोकुळमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, अध्यक्षाची एकतर्फी निवड, पडद्यामागे काय घडलं? घडामोठी वाढल्या
Gokul Chairman ElectionImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 8:25 PM
Share

गोकुळच्या अध्यक्षाची एकतर्फी निवड करण्यात आली आहे. सर्वाधिक संचालक हे समविचारी आघाडीकडे असल्याचा दावा करण्यात येत असून यासंदर्भात प्रशासकाला पत्र देणार असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. साडे पाच लाख शेतकऱ्यांचा मँडेट तुम्ही अमान्य कसा करणार? परंतू पुढच्या मीटिंगला तरी त्यांनी हजर राहावं अशी आमची अपेक्षा आहे. शशिकांत युचेकरा यांची आम्ही बहुमताने निवड केली आहे. त्यामुळे प्रशासकाने आम्हाला कार्यभार सोपवावा असं पत्र आम्ही त्यांना लिहणार आहोत, असं यावेळली सतेज पाटलांनी म्हटलं आहे.

आमच्याकडे बहुमत आहे. त्याच्याआधारे आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील युचेकर यांना अध्यक्ष म्हणून नामांकन द्यावं अशी विनंती परंतू गणपूर्तीचं कारण सांगून त्यांनी त्यामध्ये असमर्थता दर्शवली त्यानंतर त्याच ठिकाणी आम्ही बैठक घेतली आणि त्या बहुमताच्या आधारावर आम्ही शशिकांट पाटील युचेकर यांची निवड केली आहे, अशी माहिती यावेळी समविचारी आघाडीकडून देण्यात आली आहे.

आज सकाळीच गोकुळ दूघ संघाच्या अध्यक्ष निवडीसाठी ११ वाजता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, पण त्यापूर्वीच समविचारी आघाडी आणि महायुतीमध्ये नाट्य रंगलेले पाहायला मिळाले होते. महायुतीतून १२ संचालकांनी बैठकीला दांडी मारली. त्यामुळे समविचारी आघाडीच्या १३ संचालकांच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली आहे. १४ संचालकांची उपस्थिती झाल्यानंतर गणपूर्ती होते. ची न झाल्यास निवडणूक अधिकारी काय ठरवतात त्यावर पुढील राजकारण अवलंबून असते. त्यामुळे आता एकतर्फी निवड ठरवून झाल्यामुळे पुढे प्रशासक नेमका काय निर्णय घेणाल याकडे पाहावे लागणार आहे.

गोकुळच्या राजकारणात काय घडतंय?

आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने गोकुळच्या निवडणुकीत यंदा महायुतीला धक्का दिला आहे. त्यांचे १३ संचालक निवडूण आले आहेत तर विरोधी महायुतीकडे १२ संचालक आहेत. तर दोन स्वीकृत संचालकांकडे मतदानाचा अधिकार देऊन गोकुळचा अध्यक्ष ठरवला जाण्याचे नियोजन होते. पण आता संचालकांच्या अनुपस्थितीमुळे सतेज पाटलांच्या आघाडीने थेट निर्णय घेऊन टाकला आहे. पुढील बैठक १५ दिवसांनी होण्याची शक्यता आहे. त्याआधी आता प्रशासकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Follow Us
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा