भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात… शिंदे सेनेच्या बड्या नेत्याचा राजकीय बॉम्ब, म्हणाले काय?
Uddhav Thackeray and Eknath Shinde: भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे देखील एकत्र येऊ शकतात, हे राजकारण आहे, असा राजकीय बॉम्ब शिंदे सेनेच्या बड्या नेत्याने टाकला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde: कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दादर येथील एका कार्यक्रमात एकत्र दिसले. त्यांनी मिश्किल टिप्पणी, राजकीय कोट्याही केल्या. बऱ्याच दिवसानंतर राज्याचे एक राजकीय चित्र यातून प्रतिबिंबित झाले. पण त्याचवेळी भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे देखील एकत्र येऊ शकतात, हे राजकारण आहे, असा राजकीय बॉम्ब शिंदे सेनेच्या बड्या नेत्याने टाकला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
रविंद्र धंगेकर यांचा राजकीय बॉम्ब
भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे देखील एकत्र येऊ शकतात. हे राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर रवींद्र धंगेकर यांनी असा राजकीय बॉम्ब टाकला. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे रक्ताचे वारसदार आहेत. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहेत, असे सांगत धंगेकरांनी शब्दाआड बरेच काही सुचवण्याचा प्रयत्न केला.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी बॅटिंग
राज्यात नेतृत्व बदल केले पाहिजे ( मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ) पुन्हा एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद दिले पाहिजे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपातील नेते टीका करत आहेत परंतु पराभवाची जबाबदारी राज्याच्या मुख्य नेत्याची असते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता रवींद्र धंगेकर यांनी टीका केली.
बन यांना पुन्हा चिमटा
भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्या बद्दल मी काय बोलणार नाही ते पगारी नोकर आहेत, असा चिमटा रविंद्र धंगेकर यांनी काढला. त्यांनी कालही टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना नवनाथ बन यांच्यावर सडकून टिका केली होती. त्यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील तिकीट वाटप आणि भाजपने मनमानी कारभार केल्याचा गंभीर आरोप केला होता. काल लाईव्हमध्येच बन आणि धंगेकर यांच्यात शाब्दिक चकमक झडली होती. पण दोघांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे आवाहनही जाता जाता केले होते.
राज ठाकरे यांना भविष्यातील बाबी समजतात
राज ठाकरे यांना भविष्यातील बाबी समजतात त्यामुळे 2029 च्या नेतृत्वबदल संदर्भात बोलले ते खरे असू शकते. पुण्यासाठी एक नवीन प्रोजेक्ट पाणी नियोजनासाठी करावा पुण्याची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असल्याने लवकरात लवकर पाण्याचे नियोजन करण्याचं महत्त्वाचं काम पालिकेने आणि सरकारने हातात घ्यावं अशी मागणीही रवींद्र धंगेकर यांनी केली.
