AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचे इंटेलिजन्स समजून घेण्यासाठी धुरंधर सिनेमा पाहा, भाजप मंत्र्यांच्या अजब सल्ला, मग शशी थरूर यांनी थेट…

Balo Raja-Shashi Tharoor : भारताचे इंटेलिजन्स समजून घेण्यासाठी धुरंधर सिनेमा पाहण्याचा अजब सल्ला आसामचे गृहमंत्री बालो राजा यांनी दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर तोफ डागली. शशी थरूर यांनी एक ट्विट करत त्यांच्या विधानातील हवाच काढली.

भारताचे इंटेलिजन्स समजून घेण्यासाठी धुरंधर सिनेमा पाहा, भाजप मंत्र्यांच्या अजब सल्ला, मग शशी थरूर यांनी थेट...
...तर धुरंधर सिनेमा पाहा, भाजप मंत्र्यांच्या अजब सल्ला, थरूर यांनी थेट...
| Updated on: Oct 30, 2026 | 7:05 AM
Share

Balo Raja-Shashi Tharoor : भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव वाढला आहे. अरूणाचल राज्याच्या सीमारेषेवरच हा तणाव वाढल्याचे ITBP चे कमिश्नर शत्रुजीत सिंह कपूर यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. प्रकरण इतके गंभीर असताना अरूणाचल प्रदेशचे भाजपचे राज्यमंत्री बालो राजा यांनी अकलेचे तारे तोडले आहे. भारतीय सुरक्षेचे इंटेलिजन्स समजून घेण्यासाठी धुरंधर सिनेमा पाहावा असे ते म्हणाले. त्यांच्या या सल्ल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

म्हणाले धुरंधर सिनेमा पाहा

भारत आणि चीन सीमेवरील परिस्थितीबाबत आयटीबीपीच्या महासंचालकांनी गेल्या आठवड्यात निवदेन दिले होते. त्यात अरूणाचल प्रदेशच्या सीमेवरील काही ठिकाणी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये प्रत्यक्ष समारोसमोर येण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. महासंचालकांच्या या वक्तव्यानंतर अरूणाचल प्रदेशचे मंत्री बालो राजा यांनी त्यांना खडे बोल सुनावले. भारत बलाढ्य आहे. आपले इंटेलिजन्स समजून घेण्यासाठी धुरंधर सिनेमा पाहा, असा सल्लाच त्यांनी जनतेसह महासंचालकांना दिला. त्यांनी असे अकलेचे तारे तोडल्यावर मग काँग्रेसच्या गोटातून थेट हल्लाबोल झाला.

धुरंधर पाहा, ताकद लक्षात येईल

आयटीबीपी महासंचालकांच्या या वक्तव्याचा समाचार अरुणाचल प्रदेशचे राज्यमंत्री बालो राजा यांनी घेतला. तुम्ही डिआयजी पदावर कार्यरत आहात. असे वक्तव्य कसं करता, असा सवाल राजा यांनी विचारला. भारत मजबूत आहे. तुम्ही धुरंधर सिनेमा पाहिला असेल तर त्यावरून भारताच्या इंटेलिजन्सची ताकद तुमच्या लक्षात येईल. तुम्ही स्वतःला दुर्बल का समजताय? असा सवालही राजा यांनी केला.

शशी थरूर यांचा रिव्ह्यू बॉम्ब

बालो राजा यांनी अकलेचे असे तारे तोडल्यानंतर मग काँग्रेसच्या गोटातून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. शशी थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर खणखणीत प्रतिक्रिया दिली. त्यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवरील एक व्हिडिओ त्यात पोस्ट केला. धुरंधर चित्रपट पाहिल्यानंतर शशी थरूर यांनी या सिनेमाची समीक्षा केली. त्यासंदर्भातील हा व्हिडिओ आहे. त्यात देशाची सुरक्षा, सैन्याची माहिती एखादा सिनेमा पाहून घेण्याचा सल्ला देणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले.

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं