सेम स्पॉट, सेम ट्रॅक्टर, दोन अपघात, दोघे ठार! नंदुरबारमधील थरारक घटना

| Updated on: Sep 25, 2022 | 11:18 AM

एकाच स्पॉटवर एकाच दिवशी एकाच ट्रॅक्टरला धडकून दोन दुचाकीस्वार ठार झाले! दुसरा अपघात रोखता आला असता, पण...

सेम स्पॉट, सेम ट्रॅक्टर, दोन अपघात, दोघे ठार! नंदुरबारमधील थरारक घटना
भीषण अपघात
Follow us on

जितेंद्र बैसणे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार : नंदुरबारमध्ये (Nandurbar Accident) एकाच ठिकाणी दोन अपघात झाले. या अपघातामुळे दोघा दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागलाय. एकाच ठिकाणी ट्रॅकर आणि दुचाकीचा (Tractor Bike Accident) अपघात झाला. पहिल्या अपघातानंतर अपघातग्रस्त ट्रॅकर हटवण्यात आला नव्हता. तोच थोडा वेळ गेल्यानंतर आणखी एक दुचाकीही ट्रॅक्टरला येऊन धडकली. त्यामुळे एका मागोमाग एक झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू (Two biker killed) झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता.

नंदुरबार खांडबारा रस्त्यावरील बिजादेवी गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली. हॉटेल आदित्यजवळ ट्रॅक्टर आणि मोटरसायकलीचा अपघात जाला. यात एका युवकाचा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. पण अपघाताची ही घटना ताजी असतानाचा आणखी एक अपघात घडला.

दुसऱ्या घटनेमध्ये अपघातग्रस्त ट्रॅक्टर रस्त्यावर तसाच उभा होता. या ट्रॅक्टरचा अंदाज दुचाकीस्वाराला आला नाही आणि भरधाव दुचाकी ट्रॅक्टरवर आदळली. या अपघातामध्ये आणखी एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच जागेवर दोन वेळा अपघात झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

पहिल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या दिलीत सुदाम देसाई, वय 39, यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना 108 रुग्णवाहिकेनं नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण वेळेत उपचार न झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप देसाई यांच्या कुटुंबीयांनी केलाय.

दरम्यान, या अपघातानंतर ट्रॅक्टर बाजूला करण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आले. पण यावेळी पोलिसांना तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. त्यामुळे रोडवरुन ट्रॅक्टर बाजूला करताना अनेक अडचणी आल्या. एकाच ठिकाणी, एकाच ट्रॅक्टरमुळे एकाच दिवशी झालेल्या दोन अपघातांनी दोघांचा जीव घेतलाय. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. नंदुरबार पोलिसांकडून या दोन्ही अपघातांची नोंद करण्यात आलीय.

नांदेड (5 मृत्यू), सोलापूर (2 मृत्यू), बीड (3 मृत्यू), इथं झालेल्या अपघाताच्या घटनांनंतर आता नंदुरबारमध्येही अपघाताची नोंद झाली आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांत 12 जणांचा रस्ते अपघातात जीव गेल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.