हिंदू मुलींसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या दोघे बांगलादेशी अटकेत! लव जिहादचा प्रकार?

| Updated on: Nov 28, 2022 | 1:03 PM

प्रेमात पाडून लग्न करण्यासाठी मुलींवर दबाब टाकला जात असल्याचा गंभीर आरोप! कुठलंय नेमकं हे प्रकरण?

हिंदू मुलींसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या दोघे बांगलादेशी अटकेत! लव जिहादचा प्रकार?
मध्य प्रदेशात लव्ह जिहाद
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मध्य प्रदेश : इंदूरच्या (Indore News) सिरपूर तलाव येथून हिंदू मुलींसोबत अश्लिल कृत्य करणाऱ्या दोघा बांगलादेशी तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या तरुणींना बांगलादेशी तरुण आपल्या जाळ्यात अडकवत होते, असा आरोप करण्यात आलाय. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना या बांगलादेशी तरुणांना पकडून पोलिसांच्या हवाले केलं आहे. या तरुणांवर लव जिहाद (Love Jihad) केल्याचा आरोपही बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तर दोघा मुलींना त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आलं. समोर आलेल्या माहितीनुसार, दोघीही मुली अल्पवयीन आहेत. ताब्यात घेण्यात आलेले दोघे तरुण हे इंदूरमध्ये नोकरी करत असल्याची माहिती उघडकीस आलीय.

बजरंग दलाच्या वतीने शहरात लव जिहाद सारखे प्रकार रोखण्यासाठी शोध मोहीमच राबवलीय. त्यासाठी बजरंग दलाची पथकं स्थानिक कॅफे, रेस्टॉरंट, गार्डन आणि पिकनिक पॉईन्ट्सवर शोध मोहीत करत असते.

रविवारी यापैकीच एका पथकाने सिरपूर तलावावर जाऊन पाहणी केली. तेव्हा या तलावावर दोन युवक दोघा युवतींसोबत अश्लील कृत्य करताना आढळून आलेत.

या युवक-युवतींकडे बजरंग दलाच्या पथकाने आयडी कार्ड मागितले. त्यानंतर त्यांची विचारणा केली. अधिक कठोरपणे विचारणा केली असता हे तरुण मुस्लिम असल्याचं समोर आलं. तर मुली हिंदू असल्याची माहिती समोर आली.

त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावलं आणि युवकांना त्यांच्या ताब्यात दिलं. संबंधित तरुणींना विचारणा केली असता, हे तरुण त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती समोर आली आहे.

लग्नासाठी हे तरुण तरुणींवर दबाब टाकत होते, अशीही माहिती उघडकीस आली. आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केलीय. हे दोघेही ज्या ठिकाणी नोकरी करत होते, तिथेच या हिंदू मुलीही कामाला होत्या, असं तपासातून समोर आलंय.

ताब्यात घेण्यात आलेले तरुण हे बांगलादेशी असल्याची माहिती समोर आलीय. आता या तरुणांच्या नागरिकत्वाचीही पोलिसांकडून चौकशी केली जाते आहे. हे तरुणी बांगलादेशातून इंदूर येथे कसे पोहोचले, याचाही पोलीस तपास करत आहेत. या संपूर्ण प्रकरणी बजरंग दलाचे आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढे असा प्रकार आढळून आला तर संबंधित तरुणांना चोप देण्यात येईल, अशा इशारा देण्यात आलाय. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास केला जातोय.