फेसबुक फ्रेण्डकडून हॉटेल रुममध्ये बलात्कार, अश्लील व्हिडीओ शूट करत 10 लाखांची मागणी

दोघांनी एका हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी गुंगीचं औषध देऊन त्याने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने या घटनेचा व्हिडीओही शूट केला होता

फेसबुक फ्रेण्डकडून हॉटेल रुममध्ये बलात्कार, अश्लील व्हिडीओ शूट करत 10 लाखांची मागणी
प्रातिनिधिक फोटो

लखनौ : सोशल मीडियावर अनोळखी तरुणाशी झालेली मैत्री युवतीला चांगलीच महागात पडली. फेसबुक फ्रेण्डने मैत्री करुन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार इतक्यावरच थांबला नाही, तर पीडित तरुणीचा व्हिडीओ शूट करुन आरोपीने तिच्या वडिलांना पाठवला. त्यानंतर त्यांच्याकडे 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचाही आरोप केला जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली आहे. तरुणीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर तरुणाची रवानगी तुरुंगात झाली आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील लखनौमधील तालकटोरा भागात राहणाऱ्या युवतीची ओळख सनी गुप्ता नावाच्या तरुणासोबत सोशल मीडियावरुन झाली होती. 2019 मध्ये ते फेसबुकवर फ्रेण्ड्स झाले होते. आरोपी सनी गुप्ता हा आग्राचा रहिवासी आहे. दोघांमध्ये समाजमाध्यमांवरुन गप्पा सुरु होत्या. काही काळाने तो तरुणीला भेटण्यासाठी लखनौला आला.

गुंगीचं औषध देऊन पीडितेवर बलात्कार

दोघांनी एका हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी गुंगीचं औषध देऊन त्याने पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीने या घटनेचा व्हिडीओही शूट केला होता. हा अश्लील व्हिडीओ दाखवून तो युवतीला ब्लॅकमेल करत राहिला. या व्हिडीओवरुन धमकावत त्याने पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याचाही दावा केला जात आहे.

अश्लील व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल

सेंट्रल झोनच्या डीसीपी ख्याती गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी गुप्ताने हे अश्लील व्हिडीओ पीडितेच्या वडिलांच्या मोबाईलवरही पाठवल्याचं खुद्द पीडितेनेच सांगितलं. आरोपीने त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन सनी गुप्ताला आलमबाग परिसरातून अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

अपहरण नव्हे हा तर खून, मुलगी नको म्हणून आईनेच काटा काढला, लेकीची पाण्यात बुडवून हत्या

पतीची हत्या करुन मृतदेह शेतात जाळला, हिंगोलीत पत्नीसह दोन मुलं जेरबंद

Satara Murder | चारित्र्याच्या संशयातून बायकोला पेटवलं, महाबळेश्वरमधील पतीला जन्मठेपेची शिक्षा

Published On - 8:58 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI