शेवटी शोध संपला ! अपहरण नव्हे हा तर खून, मुलगी नको म्हणून आईनेच काटा काढला, लेकीची पाण्यात बुडवून हत्या

महिलेने मुलगी नको म्हणून तीन महिन्याच्या मुलीची हत्या केली आहे. क्रुरकर्मा आईने चिमुकलीची हत्या करुन तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता. लेकीची हत्या करुन तिचे अपहरण झाल्याचा बनाव करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.

शेवटी शोध संपला ! अपहरण नव्हे हा तर खून, मुलगी नको म्हणून आईनेच काटा काढला, लेकीची पाण्यात बुडवून हत्या
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या

मुंबई : काळाचौकी परिसरातून बेपत्ता झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीचा शोध शेवटी संपला आहे. सुरुवातीला अपहरण केल्याचा बनाव केलेल्या आईने याच तीन महिन्यांच्या मुलीसोबत धक्कादायक असं कृत्य केलं आहे. या महिलेने मुलगी नको म्हणून तीन महिन्याच्या मुलीची हत्या केली आहे. क्रुरकर्मा आईने चिमुकलीची हत्या करुन तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता. याआधी लेकीची हत्या करुन तिचे अपहरण झाल्याचा बनाव आरोपी आईने केला होता.  आरोपी आईचे नाव सपना मगदूम असे आहे.

नेमकं काय घडलं ?

मुंबईतील काळाचौकी परिसरात 30 नोव्हेंबर रोजी एक धक्कादायक घटना घडली होती. एका आईने आपल्या तीन महिन्याच्या मुलीचे भांडी विकणाऱ्या महिलेने अपहरण केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मुंबईत एकच खळबळ उडाली होती. गायब असलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. मात्र दोन दिवसात या अपहरण प्रकरणाला वेगळे मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार करणाऱ्या आईनेच पोटच्या मुलीचा खून केला आहे. मुलगी नको होती म्हणून आईने हे अमानुष कृत्य केलं आहे. विशेष म्हणजे मुलीचा खून करुन या आईने तिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत ठेवला होता. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर आता मुलीचा मृतदेह सापडला आहे.

खुनी आईने नेमका कोणता बनाव केला

खुनी आईने आपल्या मुलीची हत्या करुन तिचे अपहरण झाल्याचा खोटा आरोप केला होता.  महिलेने तक्रारीत भांडी विकणाऱ्या महिलेनेच माझ्या मुलीला पळवल्याचं म्हटलं होतं. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 ते 1 च्या सुमारास एक 30 ते 35 वर्षाची महिला आली आणि जुन्या मोबाईलच्या बदल्यात नवीन भांडी देण्याचा सांगून आरोपी महिलेने सपना मगदूम यांचा विश्वास संपादन केला. जुना मोबाईल आणण्यासाठी सपना मखदूम जेव्हा आतल्या रूममध्ये जात होत्या तेव्हा भांडी विकणआरी महिला मागून आली आणि तिने बेशुद्ध करण्याचे औषध सपना यांच्या नाकाला लावलं. त्यानंतर पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या चिमुकलीला या महिलेने उचललं आणि आपल्या सोबत घेऊन पसार झाली, असा दावा चिमुकलीची हत्या करणाऱ्या आईने केला होता.

दरम्यान, मुलगीच नको म्हणून चिमुकलीची हत्या केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी सखोल तपास करण्यास सुरुवात केली आहे.

इतर बातम्या :

Omicron Update | कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

param bir singh: अखेर परमबीर सिंग पोलीस खात्यातून निलंबित; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कृषिमंत्र्यांचे विमा कंपन्यांना ‘अल्टीमेटम’ : आठवड्याभरात शेतकऱ्यांनी केलेले दावे निकाली काढा


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI