AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये! थेट आमदारांची बोलावली बैठक, राजकीय घडामोडींना वेग

पार्थ पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी थेट रायगडमधील आमदारांची बैठक बोलावली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय.

पार्थ पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये! थेट आमदारांची बोलावली बैठक, राजकीय घडामोडींना वेग
eknath shinde newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 11:22 AM
Share

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी पुण्यातील आमदारांची बैठक बोलावली आहे. पार्थ पवारांनंतर आता एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी देखील आज शुक्रवारी संध्याकाळी रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांची नंदनवन निवासस्थानी बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला रायगडमधील सर्व शिवसेनेचे आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच रामदास कदम देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दिवाळीनिमित्त ही सदिच्छा भेट होणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत रामदास कदम, भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर अजित पवारांच्या अपघतावरुन गंभीर आरोप केला होता. या टीकेने महायुतीतच संघर्ष पाहायला मिळाला. आता रायगडमध्ये बोलावलेल्या बैठकीत सुनील तटकरे यांच्या विरोधात मागील काही दिवसांत केलेल्या तक्रारींवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.  त्याचबरोबर जिल्हा नियोजनापासून ते इतर महत्त्वाच्या कामात तटकरे यांचा चाललेला हस्तक्षेप, यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी मुक्कामी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संध्याकाळी मुंबईत आल्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये शिंदे गट आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत कलह पाहायला मिळत आहे. रामदास कदम यांनी थेट सुनील तटकरे यांच्या मेहुण्याचा स्टेजवर पाणउतारा केला होता. नंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. महायुतीत असतानाही तटकरे यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना निवडणुकीत छुपी मदत केल्याचा आरोप केला होता.  तसेच अजितदादांच्या अपघातात हात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यानंतर तटकरे यांनी रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे सुनील तटकरे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी रामदास कदम यांनी प्रयत्न केल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला. त्यामुळे रायगडमध्ये शिंदे गट आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीमधील वादाच्या पार्श्वभूमीवर आजच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला महत्व प्राप्त झालं आहे.

Follow Us
पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही
NCP Merger : पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान पुण्यात राजकीय खलबतं
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका
सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी...
NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?
संजय शिरसाटांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला