AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, आदिती तटकरे यांचा मोठा निर्णय, नंदुरबारचा दौरा अचानक रद्द

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असून, सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांना फोन जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी नंदूरबारचा दौरा अचानक रद्द करत मुंबईकडे धाव घेतली. पार्थ पवारांनीही आमदारांसोबत बैठक घेतली असून, अजित पवार गटातील आमदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, आदिती तटकरे यांचा मोठा निर्णय, नंदुरबारचा दौरा अचानक रद्द
aditi tatkareImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 11:14 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यातच काही नेते पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठं काही घडणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादा गटाचे 20-30 आमदार फुटणार असल्याचा गौप्यस्फोट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून आमदारांना फोन केले जात आहेत. पक्षाने तातडीच्या बैठका सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि मंत्री आदिती तटकरे यांनी नंदूरबारचा दौरा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आदिती तटकरे या मुंबईसाठी तातडीने निघणार आहेत.

मंत्री अदिती तटकरे यांच्या दौऱ्यात अचानक बदल झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना विलिनीकरणाच्या संदर्भात फोन जात असल्याच्या चर्चां होत असताना नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अदिती तटकरे यांच्या दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. अदिती तटकरे दिवसभर नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार होत्या. त्यानंतर रात्री उशिरा मुंबईला रवाना होणार होत्या. मात्र सुधारित दौऱ्यानुसार अदिती तटकरे दुपारी 4 वाजता नंदुरबारहून जळगावला रवाना होणार असून, तिथून विमानाने मुंबईला जाणार आहेत. अदिती तटकरे यांच्या दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना होण्याच्या निर्णयामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

आदितींनाही फोन?

आदिती तटकरे यांनाही सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून फोन गेल्याचं सांगण्यात येत आहे. फोन आल्यानंतर आदिती तटकरे यांनी तातडीने मुंबईला रवाना होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आज दिवसभरात राष्ट्रवादीत काय घडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पार्थ पवारांनी बोलावली बैठक

दरम्यान, पार्थ पवारांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाचे पदाधिकारी आणि निवडक आमदारांची बैठक सुरू होत आहे. जिजाई निवासस्थानी सुरू होणाऱ्या या बैठकीला सात आमदार आले असल्याचं सांगितलं जात आहे. आमदार शंकर मांडेकर आणि चेतन तुपे या बैठकीसाठी पोहचले आहेत. इतर आमदारही या बैठकीला येणार आहे. या बैठकीत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे, विलिनीकरणाबाबतची आमदारांची भूमिका काय? दुसरं म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील होणार आहात का? या दोन गोष्टी आमदारांना विचारण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, मिटिंग नेमकी कशाबाबत आहे, याची अधिकृत माहिती कुणीही दिलेली नाही.

Follow Us
सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : सुप्रिया ताईंनी विलीनीकरणाच्या खेळावर पडदा टाकलाय; संजय राऊतांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका
सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी...
NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?
संजय शिरसाटांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध