AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! भाजपाची केंद्रातील सत्ता जाणार, राज ठाकरे यांचं पहिल्यांदाच भाकीत; पोस्ट तुफान व्हायरल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. एप्रिलमध्ये भाजपची सत्ता जाऊन पंतप्रधान मोदी पायउतार होतील, असं ते म्हणाले. जेन झी आंदोलनाचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांना त्यांच्या मागील कृत्यांची भीती असल्याचंही नमूद केलं. महाराष्ट्रातील जनतेला भाजपच्या 'फोडा आणि राज्य करा' नीतीपासून सावध राहण्याचा सल्ला देत, योग्य वेळी प्रतिकार करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

सर्वात मोठी बातमी! भाजपाची केंद्रातील सत्ता जाणार, राज ठाकरे यांचं पहिल्यांदाच भाकीत; पोस्ट तुफान व्हायरल
raj thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 10:46 AM
Share

भाजपची केंद्रातील सत्ता एप्रिलमध्ये जाणार आहे… पंतप्रधान नरेंद्र मोदी मे महिन्यात पाय उतार होतील… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान होणारच नाही… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागेल, त्यांना उपपंतप्रधानपद मिळणार आहे… अशी भाकीतं विरोधकांकडून वारंवार वर्तवली जात आहेत. त्यामुळे देशात मोठ्या घडामोडी होणार का? अशी चर्चा सातत्याने होत असते. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाबाबतचं भाकीत वर्तवलं आहे. राज ठाकरे यांचे अंदाज अचूक असतात, शिवाय ते ठोस माहिती असल्याशिवाय कोणतंही भाष्य करत नाहीत, त्यामुळेच राज यांच्या भाजपबाबतच्या या भविष्यवाणीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून हे भाकीत केलं आहे. त्यासाठी राज ठाकरे यांनी जेन झीच्या आंदोलनाचा संदर्भ दिला आहे. दिल्लीत झालेल्या जेन झीच्या आंदोलनानंतर भाजपचा केंद्रापासून राज्यांपर्यंत सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरू झाला आहे. हे लवकरच घडणार आहे, असं भाकीतच राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच हे विधान केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

भाजप नेते बिथरले

भाजप आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. सत्तेतून बाहेर फेकल्यावर गेल्या 14 वर्षात जे केलं, त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसणार आहेत. याचीच भाजप नेत्यांना भीती आहे, असं सांगतानाच अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच, असं सूचक विधानही राज ठाकरे यांनी केलं आहे.

भाजपच्या डावाला बळी पडू नका

यावेळी राज ठाकरे यांनी छठ पूजेच्या वादावरूनही भाजपला फटकारलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिंकणं भाजपला कठिण झालं आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपने छठ पूजेचा सापळा रचला आहे. निवडणूक हातातून जात असल्याचं लक्षात आल्यावर भाजप फोडा आणि राज्य कराची नीती वापरत असतो. त्यामुळे मनसैनिकांनी सावध राहा. भाजपच्या कोणत्याही डावाला बळी पडू नका, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

राग आला पाहिजे, शांत बसू नका

भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जमिनींपासून जंगलापर्यंत एकाच उद्योगपतीच्या घशात घालायचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात जे दिसेल ते त्या उद्योगपतीला दिलं जात आहे. आपल्यासमोर या घटना घडत आहेत. पण आपल्याला राग येत नाही. आपण याचा राग योग्यवेळी काढला पाहिजे. शांत बसून चालणार नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ
Gokul Milk Price Hike : गोकुळ दूध महागणार? खरेदी आणि विक्री दरात प्रत्येकी एवढ्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता; ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका
सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी...
NCP Merger : सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून राष्ट्रवादीच्या आमदारांना फोनाफोनी; विलीनीकरणाबाबत विचारला थेट सवाल, नेमकं काय सुरू आहे?
संजय शिरसाटांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ल्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!